Pomegranate
Pomegranate Agrowon
ॲग्रो गाईड

Pomegranate : आंबिया बहराच्या डाळिंब बागेतील व्यवस्थापन

टीम ॲग्रोवन

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. आशिस माईती, डॉ. एन. व्ही. सिंह, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. सोमनाथ पोखरे, दिनकर चौधरी

बागेची मशागत :

- सध्या बागेमध्ये फळे (Pomegranate Fruit) वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे फांद्यावर फळांचा भार आल्याने वाकलेल्या फांद्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यासाठी बांबूने ताणलेल्या तारेला सुतळीने बांधाव्यात किंवा परिस्थितीनुसार जीआय किंवा एमएस स्ट्रक्चरला बांधाव्यात. (Pomegranate Crop Management)

ब) अन्नद्रव्य व्यवस्थापन :

-जिप्सम ६४० ग्रॅम प्रति झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट ४०० ग्रॅम प्रति झाड जमिनीत पूर्णपणे मिसळून द्यावे. त्यानंतर पाणी द्यावे.

-सिंचनाद्वारे ७ दिवसांच्या अंतराने ८ वेळा पुढील प्रमाणे खते द्यावीत. (प्रमाण - प्रति हेक्टर प्रति वेळ)

युरिया ४१.४४ ते ६९.५६ किलो, ००:५२:३४ मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट २२.२० किलो, आणि ००:००:५० पोटॅशिअम सल्फेट २२.२० किलो.

- फवारणीद्वारे १० दिवसांच्या अंतराने पुढील खते द्यावीत. (प्रमाण प्रति लिटर पाणी)

००:५२:३४ मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट ५ ते ६ ग्रॅम या प्रमाणे तीन फवारण्या आणि

मॅंगेनीज सल्फेट ६ ग्रॅम या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.

क) कीड व्यवस्थापन -

१) फळ पोखरणारी अळी (अंडी अवस्था) :

अळी किंवा अंडी यांचा कमी प्रादुर्भाव असल्यास एकच फवारणी घ्यावी. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत पुढील प्रमाणे ७ ते १० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. (पहिली वेगळी आणि दुसरी एकत्रित) (प्रमाण प्रति लिटर पाणी)

-अंडी आढळून आल्यास, ॲझाडिरॅक्टिन किंवा कडुनिंब तेल (१००० पीपीएम) ३ मिलि किंवा पोंगामिया (करंज बियांचे तेल) ३ मिलि किंवा वरील दोन्ही तेलांचे मिश्रण प्रत्येकी ३ मिलि.

-खराब झालेली/ छिद्र असलेली फळे दिसत असल्यास, सर्व खराब झालेली आणि छिद्र असलेली फळ काढून खड्ड्यात पुरून टाकावीत. सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६% ओडी) ०.७५ मिलि किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ % एससी) ०.७५ मिलि अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिलि.

२) रस शोषणारे भुंगेरे : फवारणी प्रति लिटर

थायोमिथॉक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन (९.५ % झेडसी) ०.७५ मिलि किंवा स्पिनेटोरम (१२% एससी) १ मिलि किंवा स्पीनोसॅड (४५% एससी) ०.५ मिलि किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% ईसी) ०.७५ मिलि अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिलि.

ड) रोग व्यवस्थापन

-फूलधारणेपूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने सँलिसिलिक अॅसिडच्या आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची फवारणी करण्याची शिफारस आहे. प्रमाण प्रति लिटर पाणी, सँलिसिलिक अॅसिड ०.३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण २ ग्रॅम.

- १० दिवसांच्या अंतराने फवारणीचे नियोजन - प्रमाण प्रति लिटर पाणी

बोर्डो मिश्रण ०.५% किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्ल्यूपी) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रोक्साइड (५३.८%) २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टीकर ०.३-०.५ मिलि किंवा २-ब्रोमो, २-नायट्रोप्रोपेन-१,३ डायोल (ब्रोनोपॉल ९५%) ०.५ ग्रॅम.

-जर बागेत आधीपासूनच तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्यास, स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट (९०%) अधिक टेट्रासायक्लीन

हायड्रोक्लोराइड (१०%) ०.५ ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि ७-१० दिवसांच्या अंतराने ब्रोनोपालची फवारणी घ्यावी. गरजेपेक्षा अधिक फवारण्या टाळाव्यात.

-बागांमधील बुरशीजन्य स्कॅब, ठिपके, कुजवा या रोगाच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी. दरवेळी फवारणीवेळी बुरशीनाशक बदलावे. (तक्ता १)

तक्ता १ - डाळिंबामधील बुरशीजन्य स्कॅब, ठिपके, कुजवा आदींसाठी बुरशीनाशके

१. मॅण्डीप्रोपामीड (२३.४% एससी) १ मिलि प्रति लिटर.

२. मेटीराम (५५%) अधिक पायरॅक्लोस्ट्राबीन (५% इसी) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति लिटर.

३. प्रोपीकोनॅझोल (२५% ईसी) १ मिलि अधिक ॲझाक्सिस्ट्रोबीन १ मिलि प्रति लिटर. (टॅंक मिक्स)

४. ॲझोक्सोस्ट्रोबीन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% एससी) १ ते २ मिलि प्रति लिटर.

६. बोर्डो मिश्रण ०.५%

७. कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५%) अधिक कासुगामायसीन (५%) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर.

८. झायनेब (६८%) अधिक हेक्झाकोनॅझोल (४% डब्लूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर.

९. ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम मिलि प्रति लिटर.

१०. क्लोरोथॅंलोनील (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम मिलि प्रति लिटर.

११. प्रोपिकोनॅझोल (२५% एससी) १ मिलि प्रति लिटर.

१२. फ्लुओपायरम (१७.७%) अधिक टेबुकोनॅझोल (१७.७% w/w एससी) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि प्रति लिटर.

१३. टेबुकोनॅझोल (५०% एससी) अधिक ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन (२५% w/w @ ७५ डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.५ ग्रॅम प्रति लिटर.

टीप : वरीलपैकी कोणत्याही बुरशीनाशकाच्या २ ते ३ फवारण्या १०-१४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात. एका हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकाव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक दोनपेक्षा जास्त वेळ फवारू नयेत. बोर्डो मिश्रणाव्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टिकर स्प्रेडर वापरावे.

मर रोग :

मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच त्याच्या कारणांची खात्री करा. तर मर ही बुरशीजन्य सेरटोसिस्टीस, फ्यूजारियम इ. मुळे असेल तर सेरटोसिस्टीस मुळे होणारा मर हा भयानक आहे. याचे प्राथमिक लक्षण म्हणजे पाने पिवळी होणे. लक्षणे दिसताच शक्य तितक्या लवकर बाधा झालेल्या फांदीची मुळे तपासून घ्या. अशा मुळ्या काढून,उभा काप करून आतील भाग पिवळा किंवा तांबूस आहे का ते पहावे. त्याचा वास जर अल्कोहोलयुक्त किंवा फळासारखा असल्यास सेरटोसिस्टीसमुळे होणारा मर रोग असल्याचे समजावे. काही वेळेस अशी लक्षणे अन्य मूळकुज करणाऱ्या रायझोक्टोंनिया, स्क्लेरोशिअम, फायटोप्थोरा अशा सूक्ष्मजीवांमुळे देखील होतात. त्यासाठी खालीलपैकी फक्त एका कोणत्याही पद्धतीने मातीचे निर्जंतुकीकरण करून घेतल्यास मातीतून पसरणाऱ्या किडी व रोगांच्या नियंत्रणास मदत होते.

नियंत्रण पद्धत :

पद्धत I

पहिले ड्रेचिंग - प्रोपिकोनॅझोल (२५% ईसी) २ मिलि अधिक क्लोरपायरिफॉस (२०% इसी) २ मिलि प्रति लिटर किंवा थायामेथोक्झाम (२५% डब्ल्यूजी) १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर

यापैकी एकाने ५ ते १० लिटर द्रावण प्रति झाड या प्रमाणे ड्रेचिंग करावी.

दुसरी ड्रेचिंग - पहिल्या ड्रेचिंगनंतर ३० दिवसांनी, अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड.

तिसरी ड्रेचिंग - दुसऱ्या ड्रेंचिंगनंतर ३० दिवसांनी, अर्बास्कूलर मायकोरायझा बुरशी (एएमएफ) रायझोफॅगस इरेगुल्यारिस २५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड याप्रमाणे द्यावे.

किंवा पद्धत II:

प्रोपिकोनॅझोल (२५% ईसी) २ मिलि अधिक क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रेचिंग करा.

किंवा पद्धत III :

पहिली व तिसरी ड्रेचिंग - फोसेटिल एएल (८०% डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति झाड

दुसरी व चौथी ड्रेचिंग - टेब्यूकोनॅझोल (२५.९% ईसी डब्ल्यू / डब्ल्यू) ३ मिलि प्रति झाड

या प्रमाणे २० दिवसांच्या अंतराने १० लिटर द्रावण प्रति झाड द्यावे.

महत्त्वाचे :

-ड्रेंचिंग केवळ लक्षणांच्या पहिल्या टप्प्यावर प्रभावी आहे. जर संपूर्ण फांदी प्रभावित झाल्यास प्रभावित झाड काढून टाकणे आणि सभोवतालची झाडे ड्रेंचिंग करणे उपयोगी ठरते.

-ज्या ठिकाणी संक्रमित झाड व माती पसरलेली असल्यास त्याभोवतीच्या ४ - ५ झाडांना ड्रेंचिंग करावी.

-ड्रेंचिंग ही एकतर विश्रांती काळात किंवा हंगामातील बहर नियोजनाच्या सुरुवातीला करावी.

-शॉट होल बोररचा प्रादुर्भाव असल्यास क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे ड्रेचिंग करावी.

-जर फायटोप्थोराचा प्रादुर्भाव असेल, मेटॅलॅक्झिल (८ %) अधिक मॅन्कोझेब (६४ %) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे ड्रेचिंग करावे. आजूबाजूच्या चारही झाडांनाही ड्रेचिंग करावे.

वरीलपैकी कुठल्याही एकाच पद्धतीचा अवलंब करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT