Mango Pest Agrowon
ॲग्रो गाईड

Hapus Mango in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव; उत्पादन घटणार

Alphanso : वातावरण बदलाचा हापूस आंब्यावर परिणाम होतो आहे. यंदा त्याच्या जोडीला उपद्रव आहे तो फुलकिडीचा (थ्रीप्स). थ्रीप्स १-२ मि.मी. लांबीचे, पिवळे, काळे, किंवा दोन्ही रंगाचे असतात.

Team Agrowon

पंकज दळवी

Mango Market : यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याचं उत्पादन कमी होण्याची लक्षणं आहेत. यंदा आब्यांचं पीक २० ते २५ टक्के इतकंच येईल असा अंदाज बाजारपेठेत होणाऱ्या आवकेवरून लावला जात आहे.

वातावरण बदलाचा हापूस आंब्यावर परिणाम होतो आहे. यंदा त्याच्या जोडीला उपद्रव आहे तो फुलकिडीचा (थ्रीप्स). थ्रीप्स १-२ मि.मी. लांबीचे, पिवळे, काळे, किंवा दोन्ही रंगाचे असतात.

हे विषाणूजण्य रोगाचे वाहक आहेत. पानांच्या वरच्या बाजुला छोटे चंदेरी चट्टे पडतात. त्याला सिल्वरींग म्हणतात. नंतर असेच पांढरे चट्टे मोहोरावर पण येऊ लागतात.

थ्रीप्स व त्यांची पिल्ले पानांच्या खालच्या पृष्ठावर पुंजक्यांनी आसरा बनवतात. ह्या प्रादुर्भावाने पाने पिवळी, सुकलेली, आक्रसलेली व वेडीवाकडी होतात.

हा सर्व प्रादुर्भाव मोहोर धरण्याच्या कालावधीत झाल्याने मोहोर करपु लागतो. फळधारना झाल्यास तिच्यावरही ह्याचा परिणाम होतो. वेडीवाकडी फळधारणा होते. उत्पादनात घट हे तर ओघाने आलंच.

थ्रीप्सच्या वाढीसाठी कोरडे आणि गरम वातावरण पोषक असते. आर्द्रता असलेल्या वातावरणात त्यांची वाढ होत नाही.

कोकणातील वातावरण एरवी उष्ण, दमट असते. पण नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये हवामानात आर्द्रता असते. पण तरीही इथे थ्रीप्सचा प्रादुर्भाव होतोय, म्हणजे वातावरण सामान्य राहिलेलं नाही, याचाच हा पुरावा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Processing Business: मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी क्लाउड किचन, फूड ट्रक

Flower Fertilizer: निर्माल्यातून तीन टन खतनिर्मिती

Maharashtra Farmer Issue: पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

Rice Farming: पावसामुळे भातशेती बहरली

Rainfall Impact: पर्जन्यमापकाच्या कचाट्यात सापडला शेतकरी

SCROLL FOR NEXT