Paddy Crop Management
Paddy Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Paddy : भात पुनर्लागवडीनंतरचे कीड-रोग व्यवस्थापन

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. किरण रघुवंशी

सध्या भात पिकाची पुनर्लागवड (Paddy Re Planting) बहुतांश ठिकाणी पूर्ण झाली आहे. लागवडीनंतर पहिल्या तीस दिवसांदरम्यान पिके फुटवे फुटण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये असतील. या अवस्थेमध्ये येणाऱ्या किडी, रोग यांच्या नियंत्रणासाठी (Paddy Pest Disease Management) करावयाच्या उपाययोजना पुढील प्रमाणे -

प्रतिबंधक उपाय

* कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरॅक्टिन १० हजार पीपीएम) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

* सुरुवातीला किडींच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील (०.३ जी) ३३ किलो किंवा कारटॅप हायड्रोक्लोराइड (४ जी) २५ किलो प्रति हेक्टरी वापरावे

* सूत्रकृमीग्रस्त भागात हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

१) खोड कीड

* खोड किडीची अंडी नष्ट करण्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळी रोपांची शेंडे खुडून लागवड करावी.

* किडीच्या निरीक्षणासाठी ८ कामगंध सापळे प्रति हेक्टर लावावेत. नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरणार असल्यास त्यांचे प्रमाण हेक्टरी २० करावे. हे सापळे पिकाच्या वर राहतील, असे लावावेत. एका सापळ्यात ३०-३५ पतंग एका आठवड्यात आढळून आल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी.

* कीड आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० डब्लूपी) १००० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा क्लोरॲन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) १५० मि.लि. प्रति हेक्टरी या प्रमाणे फवारणी करावी.

*खोड किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम या प्रजातीचे एक लक्ष प्रौढ प्रति हेक्टरी आठवड्याचे अंतराने पीक लागवडीनंतर १५ दिवसाने ५-६ वेळेस प्रसारित करावेत.

२) गाद माशी नियंत्रणासाठी, क्लोरपायरीफॉस (२० इसी) १००० मि.लि. प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील (०.३ जी) २५ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

३) काटेरी भुंगा प्रादुर्भाव असल्या, क्लोरपायरीफॉस (२० इसी) १००० मि.लि. प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस (२५ इसी) १२०० मि.लि. प्रति हेक्टर प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारावेत.

४) पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी, कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० डब्लूपी) १००० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) १५० मि.लि. प्रति हेक्टर प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी.

ट्रायकोग्रामा चिलोनीस या प्रजातीचे एक लक्ष प्रौढ प्रति हेक्टरी आठवड्याचे अंतराने पीक लागवडीनंतर १५ दिवसाने ५-६ वेळेस प्रसारित करावेत.

५) पोंग्यातील अळीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३ जी) २५ किलो प्रति हेक्टर किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड (४% जी) २५ किलो प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील (५% एससी) १००० ते १५०० मि.लि. प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी.

६) पोंग्यातील अळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतातील पाणी सोडून द्यावे. त्यानंतर क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) १५० मि.लि. प्रति हेक्टर फवारणी करावी.

या अवस्थेतील रोगांचे नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर पाणी

१) करपा किंवा तपकिरी ठिपके -

ट्राफ्लोक्सीस्ट्रॉबीन अधिक टेब्युकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) ०.४ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम अधिक मॅन्कोझेब २ ते २.५ ग्रॅम.

शेतात या रोगांचा प्रादुर्भाव असल्यास नत्रयुक्त खते देऊ नयेत.

२) अणुजीवजन्य करपा किंवा कडा करपा -

शेतात या रोगांचा प्रादुर्भाव असेल तर नत्रयुक्त खते कमी प्रमाणात आणि विभागून द्यावीत.

३) पर्णकोष करपा -

हेक्साकोनॅझोल (५ इसी) २ मि.लि. .

शेतात या रोगांचा प्रादुर्भाव असल्यास नत्रयुक्त खते कमी प्रमाणात उशिराने आणि विभागून द्यावे.

४) टुंग्रो रोग - हा हिरवे तुडतुड्यामुळे पसरतो. हिरव्या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी,

फिप्रोनील (०.३ जी) २५ किलो प्रति हेक्टर किंवा फिप्रोनील (०.५ एससी) १००० ते १५०० मि.लि. प्रति हेक्टर किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) १०० ग्रॅम प्रति हेक्टर वापरावे

भातावरील विविध कीड व रोग आर्थिक नुकसान पातळी

कीड व रोग --- आर्थिक नुकसान पातळी

खोड कीड --- १०% वाळलेल्या लोंब्या किंवा एक अंडी पुंज प्रति चौ. मी. किंवा एक पतंग प्रति चौ. मी. किंवा ३० पेक्षा जास्त पतंग प्रति कामगंध सापळा प्रति आठवडा पिकाच्या पोटरी अवस्थेपर्यंत.

गाद माशी --- फुटव्याच्या अवस्थेत ५ % चंदेरी लोंब्या.

तपकिरी तुडतुडे --- पीक वाढीच्या अवस्थेत १० किडी प्रति चुड किंवा २० किडी प्रति चुड पुढील अवस्थेत

हिरवे तुडतुडे --- टुंग्रो रोगाच्या परिसरात २ किडी प्रति चुड किंवा २० ते ३० किडी प्रति चुड इतर ठिकाणी.

पाने गुंडाळणारी अळी --- जिवंत अळीसहित २ कीडग्रस्त किंवा कुरतडलेली पाने प्रति चुड.

लोंबीतील ढेकण्या --- १ लहान किंवा प्रौढ कीटक प्रति चुड.

पानावरील करपा --- एका पानावर रोगाचे ३ ते ५ ठिपके.

तपकिरी ठिपके --- एका पानावर रोगाचे २ ते ३ ठिपके आणि २ ते ३ रोगग्रस्त झाडे प्रति चौरस मीटर.

पर्णकोष करपा --- ५-६ मिमी लांबीचे रोगाचे चट्टे आणि २ ते ३ रोगग्रस्त झाड प्रति चौरस मीटर.

पर्णकोष कूज --- पर्णकोषावर २ ते ३ मिमी लांबीचे रोगाचे चट्टे आणि ३ ते ५ रोगग्रस्त झाडे प्रति चौरस मीटर.

अणुजीवजन्य करपा/ कडा करपा --- २ ते ३ कडा करपाग्रस्त पाने प्रति चौरस मीटर.

टुंग्रो रोग --- टुंग्रो रोगग्रस्त १ झाड प्रति चौरस मीटर आणि २ हिरवे तुडतुडे प्रति चुड.

मानेवरील करपा --- मानेवरील करपा ग्रस्त २ ते ५ झाडे प्रति चौरस मीटर.

कीड रोग व्यवस्थापनातील महत्त्वाचे

* परभक्षी कीटकाच्या संवर्धनासाठी बांधावर चवळी, मूग, सोयाबीन, झेंडू किंवा अन्य फुलझाडांची लागवड करावी.

* शेतात एकरी १५-२० पक्षी थांबे उभारावेत.

* शिफारशीनुसार रासायनिक खताचा वापर करावा. नत्र खते गरजेनुसार विभागून द्यावीत.

* शेतात कीड व रोग प्रादुर्भावावर नियमित लक्ष ठेवणे.

* कीड व रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यावरच फवारणी करावी.

* तुडतुड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी झाडाच्या बुंध्याकडून फवारणी करावी.

* दाणेदार कीटकनाशकाचा वापर करताना खाचरात ५ सेंमी पाणी ३-४ दिवस बंदिस्त ठेवावे.

* पीक फुलोऱ्यात आल्यानंतर दाणेदार कीटकनाशकाचा वापर करू नये.

* भातामध्ये तणनाशकाची फवारणी पॉवर स्पेअरने करू नये. तसेच तणनाशक फवारणीनंतर शेतामधील पाणी काढू टाकू नये, किंवा देऊ नये.

* रिमझिम पाऊस, अति तापमान आणि वेगाने हवा असताना फवारणी करणे टाळावे.

* शक्यतो एका हंगामात एक कीडनाशक एकदाच वापरावे. कीड नियंत्रणासाठी पायरेथ्रॉईड्स वर्गातील कीडनाशके वापरू नयेत.

* परभक्षी कीटक सोडण्यापूर्वी काही ठराविक दिवस शेतात कीडनाशकांची फवारणी केलेली नसावी.

डॉ. किरण रघुवंशी, ९४०५००८८०१

भात रोग शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, लोणावळा, जि. पुणे

डॉ. नरेंद्र काशीद , ९४२२८५१५०५

(प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT