Paddy Pest And Disease Management
Paddy Pest And Disease Management Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Protection : भात पिकाचे प्रभावी संरक्षण

Team Agrowon

भात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामागील अनेक कारणांपैकी कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे प्रमुख कारण होय. त्यामुळे भात पिकाच्या संरक्षणासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.

प्र मुख रोग - करपा, (Blight) पर्ण करपा आणि कडा करपा हे तीन प्रकारचे करपा रोग येतात. यापैकी करपा आणि पर्ण करपा हे रोग बुरशीजन्य तर कडा करपा अणुजीवामुळे होणारा रोग आहे. तसेच तपकिरी ठिपके, (Brown Spot) आभासमय काजळी आणि उदबत्ता हे रोग कमी अधिक प्रमाणात येतात.

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. किरण रघुवंशी

करपा / ब्लास्ट-

पर्ण करपा- लागवडीनंतर ३०-४०-दिवसांनी प्रादुर्भाव.

कडा करपा (जिवाणूजन्य करपा)-जास्त पावसाच्या प्रदेशात फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात येतो. प्रथम प्रादुर्भाव रोगग्रस्त बियणांमार्फत, तर शेतामधील प्रसार पाणी आणि पावसाच्या थेंबामार्फत.

एकात्मिक रोग व्यवस्थापन :

रोग प्रतिकारक वाणांचा वापर. उदा. इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती, फुले राधा.

निरोगी व प्रमाणित बियाण्यांचा वापर.

बीज प्रकिया - ३% मिठाच्या पाण्याची प्रकिया. त्यानंतर कॅप्टाफॉल (७५ डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रकिया.

अणुजीवाणू करपा किंवा कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी रोममुक्त क्षेत्रातील बियाण्यांचा वापर करावा. आणि रोगाचा प्रादुर्भाव होत असलेल्या क्षेत्रामध्ये नत्रयुक्त खतांच्या मात्रा एकाऐवजी जास्त वेळा विभागून द्याव्यात.

रोग वाढू नये म्हणून भात खाचरात ५ सेंमी पाणी साठून राहील, याची काळजी घ्यावी.

काणी आणि उदबत्ता रोगाच्या लोंब्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्यांचा नाश करावा.

रोग दिसताच बुरशीनाशकाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. द्रावणामध्ये स्टिकर एक मि.लि. प्रति लिटर मिसळावे.

अ) करपा आणि पर्ण करपा रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी हेक्साकोनॅझोल (५ टक्के ईसी) २ मि.लि. किंवा ट्रायसायक्लॅझोल (७५ डब्ल्यूपी) ०.६ ग्रॅम.

ब) पर्ण करपा रोग नियंत्रणासाठी, प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी) ०.६५ मि.लि. पान ४ वर पान १ वरून

दमट हवामान, जास्त आर्द्रता, खाचरात साठून राहणारे पाणी, अनियमित पाऊस या बाबी भात पिकावरील किडीस अनुकूल आहेत. त्यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते. भात पिकावर १०० पेक्षा जास्त किडींची नोंद आहे.

एकात्मिक भात कीड व्यवस्थापन

दमट हवामान, जास्त आर्द्रता, खाचरात साठून राहणारे पाणी, अनियमित पाऊस या बाबी भात पिकावरील किडीस अनुकूल आहेत. महाराष्ट्रात खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, काटेरी भुंगा, लोंबीतील ढेकण्या, गादमाशी, खेकडा, इत्यादी किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळून येतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून धसकटे गोळा करून त्यांचा नाश करावा, यामुळे खोडकिडी, लष्करी अळी यांच्या सुप्तावस्थेतील कोषांचा नाश होईल.

भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी. जमीन समपातळीत आणावी.

कीड प्रतिकारक वाणांची लागवड करावी.

भात शेतात निसर्गत: मिरीड, ढेकूण, कोळी, इ. विविध परभक्षी किटक उपलब्ध असतात. त्यांचे संवर्धन करावे.

फेरपालटामुळेही कीड नियंत्रणासाठी मदत होते.

कीडनियंत्रणासाठी पुढील प्रमाणे नियोजन करावे.

(फवारणी प्रमाण - प्रति लिटर पाणी)

अ) खोडकिडा

१) फिप्रोनील (०.३ जी) ३३ किलो किंवा कारटॅप हायड्रोक्लोराइड (४ जी) २५ किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. या वेळी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.

२) जमिनीतून देणे शक्य नसल्यास, कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० टक्के एसपी) २ ग्रॅम किंवा क्लोरॲंट्रानिलीप्रोल ( १८.५ एसपी) ३ मि.लि.

ब) तपकिरी तुडतुडे :

इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) अर्धा मि.लि. किंवा फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मि.लि.

पाने गुंडाळणारी अळी - कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० टक्के एसपी) २ ग्रॅम

क) तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा

निबोंळी अर्क (५ टक्के) किंवा कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० टक्के एसपी) २ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के एससी) ३ मि.लि.

ड) तुडतुडे, खोडकिडा, गादमाशी - फिप्रोनील (५ टक्के एससी) ३ मि.लि.

इ) लष्करी अळी -

क्लोरपायरिफॉस (२०% प्रवाही) २ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.२ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५.२ ईसी) १ मि.लि.

खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत. जैविक नियंत्रणासाठी ‘ट्रायकोग्रामा जापोनिकम’ या प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याचे अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यानी चार वेळा प्रसारित करावेत.

पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ‘ट्रायकोग्रामा चिलोनिस’ या प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याचे अंतराने वरील प्रमाणे चार वेळा प्रसारित करावेत.

भात शेतात निसर्गत: मिरीड, ढेकूण, कोळी, इ. विविध परभक्षी कीटक उपलब्ध असतात. त्यांचे संवर्धन करावे.

खाचरात खेकड्याच्या बंदोबस्तासाठी हंगामाच्या सुरुवातीला किंवा प्रादुर्भाव दिसून आल्यास विषारी आमीष वापरावे. त्यासाठी ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ७५ ग्रॅम प्रति १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. या आमिषाचे १०० लहान-लहान गोळे करून खेकड्याच्या बिळात टाकावेत.

उंदराच्या नियंत्रणासाठी खोल नांगरट करून बांधाची छाटणी करावी. जमीन तयार करतेवेळी जुनी बिळे बुजवून त्यांची घरे नष्ट करावीत. झिंक फॉस्फाइड (२.५ टक्के) १० ग्रॅम हे ३८० ग्रॅम भरडधान्यात मिसळून, १० मि.लि. खाद्यतेल मिसळावे. याच्या गोळ्या करून विषारी आमिष म्हणून वापराव्यात.

डॉ. नरेंद्र काशीद

९४२२८५१५०५

(प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र,

वडगाव मावळ, जि. पुणे)

 डॉ. किरण रघुवंशी ८०१०९७४७५५

(भातरोग शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र,

लोणावळा, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT