Mosambi Agrowon
ॲग्रो गाईड

Orange Crop Management : शेतकरी नियोजन पीक : संत्रा

आंबिया बहर घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. बाग ताणावर असताना त्यावर द्रवरूप फॉस्फेटची फवारणी घेतली जाते.

Team Agrowon

Orange Crop Advice : अमरावती जिल्ह्यातील बोदड येथील चौधरी कुटुंबीयांची चार एकर संपूर्ण बागायत शेती आहे. विपुल व त्याचे वडील गजाननराव हे त्याचे व्यवस्थापन करतात. त्यांच्याकडे सोळा बाय सोळा फूट अंतरावर सुमारे आठ वर्षांची ५५० झाडे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उत्पादन घेत आहेत.

सुरुवातीपासूनच विविध संशोधन संस्थेचा सल्ला आणि संत्रा व्यवस्थापनासंदर्भात बारकावे अभ्यासून शास्‍त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करत आहे.

त्यामध्ये जमीन आणि खोड यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे झाडे सशक्त करण्यात यश आले आहे. त्यांची उत्पादकता एकरी १६ ते १७ टनांपर्यंत पोहोचली आहे. फळझाडांकडून अन्नद्रव्यांचे शोषण होण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करतात.

नाव : विपुल गजानन चौधरी

गाव : रा. बोदड, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती

क्षेत्र ः चार एकर (५५० संत्रा झाडे)

आंबिया बहराचे नियोजन

१) आंबिया बहर घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. बाग ताणावर असताना त्यावर द्रवरूप फॉस्फेटची फवारणी घेतली जाते. झाडांमध्ये जर फॉस्फरस योग्य प्रमाणात साठवलेला असल्यास फुटीची समस्या उद्‍भवत नाही.

२) दरवर्षी डिसेंबरमध्ये कुजलेले शेणखत प्रति झाड पाच किलो ही मात्रा देतो. त्यानंतर बागेला पाटपाणी पद्धतीने भरपूर पाणी देतो. त्यानंतर सेंद्रिय कर्ब १४% असलेले खत, एरंडी ४०% आणि निंबोळी पेंड ६०% या प्रमाणात सेंद्रिय खते दिली जातात. ही खते प्रति झाड एक किलो या प्रमाणात देतो.

३) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कीडनाशकांची एक फवारणी घेतली. त्याच प्रमाणे १२:६१:००, झिंक आणि वाढवर्धकाची एक फवारणी घेतली जाते. त्यामुळे बागेमध्ये फूट चांगल्या प्रकारे व एकाच वेळी फुटण्यास मदत होते. जानेवारी अखेरपर्यंत बाग चांगल्या प्रकारे फुटून आली आहे.

४) फूट झाल्यानंतर पुढे मी पाणी पाळीतील अंतर किमान वीस दिवसांचे ठेवतो.

५) फेब्रुवारीमध्ये नवीन नवतीचे प्रमाण खूप होते. मात्र त्यावर येणाऱ्या खाकी घोळे, सिट्रस सायला, काळा मावा यांच्या नियंत्रणावर भर द्यावा लागतो. त्याच प्रमाणे फुलांचे फळामध्ये रूपांतर होण्यासाठी बोरॉन आणि कमतरता असलेल्या घटकांची फवारणी केली.

६) याच वेळी बागेला नेहमीपेक्षा अधिक (सुमारे तीनपट) पाणी दिले.

आगामी नियोजन

१) फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दरवर्षी फुलकिडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो, त्याच्या नियंत्रणावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. रासायनिक नियंत्रणासोबतच निमऑइलचाही वापर केला जाईल.

२) झाडामध्ये डायबॅकचे प्रमाण वाढू शकते. म्हणून बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी लागेल.

३) संत्रा फळे हरभऱ्याच्या आकाराची झाल्यानंतर फळगळ सुरू होते. विशेषतः तापमानात झालेल्या वाढीचा हा परिणाम असतो. त्या पार्श्‍वभूमीवर प्रति झाड एक किलो सिलिकॉन, झिंग आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याचे नियोजन आहे.

४) मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिलिकॉनची एखादी फवारणीही घेण्याचा विचार आहे. फळांवर सिलिकॉनचा एक थर राहिल्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बागेत फळगळीची समस्या उद्‍भवणार नाही.

५) दरवर्षी माझा सुमारे २५० रुपये प्रति झाड इतका व्यवस्थापन खर्च होतो. मात्र फळांपासून येणाऱ्या उत्पन्नांचे लक्ष्य हे १० पट (२,५०० रुपये) ठेवले जाते.

६) सध्या फळाचा आकार तुरीइतका आहे. त्यावर लाल कोळी, फूल किडी याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बागेत सातत्याने निरीक्षणे घेत राहून नुकसान पातळीनुसार फवारणीचा निर्णय घ्यावा लागतो.

विपुल चौधरी, ९५८८४६२२७२ (शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT