Methi Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Methi Cultivation : कमी खर्चात जास्त फायदा देणाऱ्या मेथीची लागवड

Methi Crop : मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्या-टप्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

Team Agrowon

Fenugreek Cultivation : मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी मेथीची टप्प्या-टप्याने लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.

मेथीची लागवड प्रामुख्याने जून आणि फेब्रुवारी महिन्यात केली जाते. मेथी ची दोन प्रकारे लागवड करता येते. मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक म्हणून. मुख्य पीक म्हणून लागवड करायची असल्यास तीन मिटर बाय दोन मीटर च्या सपाट वाफ्यामध्ये लागवड करतात. मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. या कारणामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते.

दोन ओळींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवून मेथीचे बी फेकून लागवड करतात. तसेच आंतरपीक म्हणून मेथी पिकाची लागवड करायची असल्यास मुख्य पिकातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वीस ते तीन सेंटीमीटर जागेत लागवड करतात.

बियाणांचे प्रमाण

मेथीचे मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते. आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे.

सुधारित जाती

फुले कस्तुरी : फुले कस्तुरी हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केले आहे. हे वाण जास्त उत्पादनक्षम असून जास्त फुटवे फुटतात. हे वाण मर आणि नागअळीला सहनशिल आहे.

या मेथीची उगवण लागवड केल्यावर सात ते आठ दिवसात होते.

कस्तुरी सिलेक्शन : कस्तुरी सिलेक्शन हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संशोधित करण्यात आले आहे. हे वाण खायला चविष्ट असते.

या वाणाची रोपे लहान आणि नाजूक असल्याने या वाणाला बाजारात चांगली मागणी असते. या मेथीची उगवण लागवड केल्यावर तीन ते चार दिवसात होते. पुसा अर्ली बंचिंग, कसुरी या जातींपासूनही चांगले उत्पादन मिळते.

मेथी पिकाला सुरुवातीला हेक्टरी २० किलो आणि नंतर खुरपणी झाल्यानंतर २० किलो नत्र द्यावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.

मेथी पीक जातीनूसार ४० ते ६० दिवसात तयार होते. उत्पादन हेक्टरी ७ ते ८ टनापर्यंत मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APL Farmer Scheme: केशरी शिधापत्रिकाधारक १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रोख रक्कम, ६६ कोटी निधी मंजूर

Illegal Sand Mining: नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; सव्वाकोटींचा मुद्देमाल जप्त

Paddy Sowing Delay: पाऊस लांबल्यामुळे भात पेरणी रखडली

Farm Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती

Farmers Protest: कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

SCROLL FOR NEXT