Crop Nutrition : पीक पोषणासाठी मुख्य अन्नद्रव्ये महत्त्वाची

Nutrient Management : सर्व वनस्पतींच्या वाढीकरिता अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती अन्नद्रव्ये, ह‏वा, पाणी आणि मातीतून शोषण करत असतात. अन्नद्रव्याचे कार्य कसे चालते हे समजून घेणे अवघड असले तरी जरुरीचे आहे‏.
Crop Nutrition
Crop Nutrition Agrowon
Published on
Updated on

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. सय्यद इस्माईल

Indian Agriculture : सर्व वनस्पतींच्या वाढीकरिता अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती अन्नद्रव्ये, ह‏वा, पाणी आणि मातीतून शोषण करत असतात. अन्नद्रव्याचे कार्य कसे चालते हे समजून घेणे अवघड असले तरी जरुरीचे आहे‏. पीक पोषणासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता प्रामुख्याने मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार आणि वाण यावर अवलंबून असते. वनस्पती, पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण केश मुळांद्वारे करते. तर मोठ्या मुळ्यांचा उपयोग वनस्पतीला आधार देण्यासाठी तसेच अन्न आणि पाण्याचा साठा करण्यासाठी होतो.

नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये पीक पोषणामध्ये अतिशय महत्त्वाचे कार्य करतात. मातीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती होण्यासाठी आणि संतुलित खत व्यवस्थापनासाठी माती परिक्षण अत्यंत गरजेचे आहे. तसेच पानांचे, खोडांचे किंवा मुळांचे पृथःकरण करूनही पिकास पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्धता होते का याविषयी माहिती मिळते. उपलब्ध माहितीच्या आधारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. त्यासाठीच पृथ:करण अह‏वाल मृदा शास्त्रज्ञांमार्फत समजून घ्यावा. त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास संतुलीत पीक पोषण करणे शक्य होते.

Crop Nutrition
Crop Nutrition Management : पीक पोषणासाठी विशेष खते

माती परिक्षण

रासायनिक खतांची मात्रा वेगवेगळ्या पद्धतीने ठरविता येते. यामध्ये प्रामुख्याने माती परिक्षण अहवालानुसार, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार किंवा पाने व देठ परिक्षण करून खत मात्रा ठरविता येते. माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन करताना शिफारशीत खतमात्रेत आवश्यक बदल करणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांचे प्रमाण, स्तर व रासायनिक खतमात्रेत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. माहितीसाठी खालील तक्ता विचारात घ्यावा.

अन्नद्रव्यांचे संतुलन महत्त्वाचे

पिकांना संतुलित अन्नद्रव्यांची उपलब्धता होणे आवश्यक असते. पिकांना मुख्यत्वे १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी एखादे अन्नद्रव्य जरी कमी असेल तर पिकाची वाढ योग्यरीत्या होत नाही. पिकांना सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत असेल, सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन पिके हि‏रवीगार दिसतात.

पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांमधून (कंपोस्ट, गांडुळ‎ खत, हि‏रवळीचे खत, वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी, मासळी खत इ.) आणि रासायनिक खतांद्वारे केला जातो. सेंद्रिय खते जमिनीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये चांगले परिणाम घडवून आणतात. रासायनिक खतांमध्ये मोजकेच (एक, दोन, तीन) अन्नद्रव्ये असतात. परंतु त्यांचे प्रमाण जास्त असते.

रासायनिक खते खरेदी करताना खतांमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण, पिकांची वाढीच्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज आणि खताची किंमत या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे‏. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खते उपलब्ध असतात. त्यामध्ये १७:१७:१७ किंवा २०:२०:०० किंवा १९:१९:१९ असे अंक असतात. हे‏ अंक अन्नद्रव्यांचे खतामध्ये असलेले शेकडा प्रमाण दर्शवितात. म्ह‏णजे अनुक्रमे १७ टक्के नत्र, १७ टक्के स्फुरद व १७ टक्के पालाश.

Crop Nutrition
Crop Nutrition: पीक पोषणासाठी सल्फरलेपित युरिया उपयुक्त

मृदा परिक्षणावर आधारित जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये,

स्तर आणि शिफारशीत मात्रेत करावयाचा बदल

अन्नद्रव्ये स्तर नत्र

(कि./हे.) स्फुरद (कि./हे.) पालाश (कि./हे.) शिफारशीत अन्नद्रव्ये मात्रेत करावयाचा बदल

कमी २५० १० १५० शिफारशीत मात्रा २५ टक्के जास्त द्यावी.

मध्यम २५० ते ५०० १० ते २५ १५० ते ३०० शिफारशीत अन्नद्रव्ये मात्रा द्यावी.

अधिक ५०० २५ ३०० शिफारशीत अन्नद्रव्ये मात्रा २५ टक्के कमी द्यावी.

अ) नत्रयुक्त खते

नाव नत्राचे प्रमाण (टक्के)

१) अनहायड्रस अमोनिया (कोरडा अमोनिया) ८२ टक्के

२) अमोनियाचे द्रावण २२ ते २५ टक्के

३) अमोनिअम क्लोराईड २५ ते २६ टक्के

४) अमोनिअम नायट्रेट ३३ ते ३४ टक्के

५) अमोनिअम सल्फेट २१ टक्के नत्र, २४ टक्के गंधक

६) मोनोअमोनिअम फॉस्फेट ११ टक्के नत्र

७) डायअमोनिअम फॉस्फेट १८ ते २१ टक्के नत्र, ४६ ते ५४ टक्के स्फुरद

८) अमोनिअम फॉस्फेट सल्फेट १३ ते १६ टक्के नत्र, २० ते ३९ टक्के स्फुरद, ३ ते १४ टक्के गंधक

९) अमोनिअम पॉलीफॉस्फेट १० ते ११ टक्के नत्र, ३४ ते ३७ टक्के स्फुरद

१०) अमोनिअम बायो सल्फेट १२ टक्के नत्र, २६ टक्के गंधक

११) युरिया ४६ टक्के नत्र

१२) युरिया सल्फेट ३० ते ४० टक्के नत्र, ६ ते ११ टक्के गंधक

१३) युरिया अमोनिअम नायट्रेट २८ ते ३० टक्के नत्र

१४) युरिया अमोनिअम फॉस्फेट २१ ते २८ टक्के नत्र, ३० ते ४२ टक्के स्फुरद

१५) युरिया फॉस्फेट १७ टक्के नत्र, ४४ टक्के स्फुरद

ब) नायट्रेटयुक्त खते

अ. क्र. नाव प्रमाण (टक्के)

१ कॅल्शिअम नायट्रेट १५ टक्के नत्र, ३४ टक्के चुना

२ पोटॅशिअम नायट्रेट १३ टक्के नत्र, ०.५ टक्के चुना, ४४ टक्के पालाश, ०.५ टक्के मॅग्नेशिअम ०.२ टक्के गंधक

क) स्फुरदयुक्त खते

नाव प्रमाण (टक्के)

सिंगल सुपर फॉस्फेट १६ ते १८ टक्के स्फुरद

ट्रिपल सुपर फॉस्फेट ४० ते ४६ टक्के स्फुरद

डाय सुपर फॉस्फेट ३२ टक्के स्फुरद

ड) सायट्रीक ॲसिडयुक्त स्फुरद खते

नाव स्फुरदाचे प्रमाण (टक्के)

बेसिक स्लज १४ ते १८ टक्के

डाय कॅल्शिअम फॉस्फेट ३४ ते ३९ टक्के

इ. पाणी व सायट्रीक ॲसिडमध्ये न विरघळ‎णारे

नाव प्रमाण टक्के

रॉक फॉस्फेट २० ते ४० टक्के स्फुरद

हाडाची खते २० ते २५ टक्के स्फुरद

हाडाची वाफेवर तयार केलेली खते २२ टक्के स्फुरद

ई. इतर स्फुरदयुक्त खते

नाव प्रमाण टक्के

मोनो अमोनिअम फॉस्फेट ३२ टक्के स्फुरद, १२ टक्के नत्र

डाय अमोनिअम फॉस्फेट ४६ टक्के स्फुरद, १८ टक्के नत्र

अमोनिअम पॉलीफॉस्फेट ३४ ते ३७ टक्के स्फुरद, १० ते १५ टक्के नत्र

नायट्रिक फॉस्फेट १४ ते २८ टक्के स्फुरद, १४ ते २८ टक्के नत्र

पोटॅशिअम फॉस्फेट २२ टक्के स्फुरद, २९ टक्के पालाश

ड. पालाशयुक्त खते

अ) पालाशयुक्त खते

नाव पालाशचे प्रमाण टक्के

पोटॅशिअम क्लोराईड ६१ टक्के

ब) क्लोरिन विरहित खते

पोटॅशिअम नायट्रेट ४४ टक्के पालाश

पोटॅशिअम सल्फेट ५० ते ५३ टक्के पालाश

पोटॅशिअम मॅग्नेशिअम सल्फेट २२ टक्के पालाशडॉ.

पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com