Sugarcane Khodava  Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Khodava : ऊस खोडवा ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाची कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन (Sugarcane Production) घटन्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाची कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे.

राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतकाच आहे.

म्हणून ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाप्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. खोडवा ऊस व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

ऊस खोडव्याचा खर्च लागणीच्या उसापेक्षा ३० टक्यांनी कमी येतो. जमीन मशागत, बेणे आणि लागणीच्या खर्चामध्ये पूर्णपणे बचत होते. खोडवा ऊस पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान वापरल्यास लागणीच्या उसापेक्षा उत्पादन जास्त येवू शकते असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील संशोधनावरून दिसून आले आहे. 

खोडव्याचे उत्पादन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने कमी येते. त्यामध्ये प्रामुख्याने तळापासून बुडखे न छाटल्यामुळे जोमदार फुटवे फुटत नाही.

खोडव्यासाठी जास्त फुटवे फुटणाऱ्या जातींची निवड केली जात नाही. खोडवा पिकासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा केला जातो. बुडख्यावरील पाचट बाजूला केले जात नाही.

ऊसतोड ऑक्टोबर पासून एप्रिल - मे पर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. १५ फेब्रुवारी नंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.

पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानूसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळत.  

ऊस तोडणी यंत्राने उसाची तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील पाचट बाजूला करण किंवा बुडखे छाटण ही कामे करावी लागत नाहीत.

कारण यंत्राने पाचटाचे आपोआप लहान तुकडे होतात व जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो.

तोडणी जमिनीलगतच होत असल्यान पुन्हा बुडखे छाटण्याचीही गरज पडत नाही. यंत्रान ऊस तोडणी केल्यास खोडव्याची फुट खुप चांगली होते.

खोडवा ठेवताना या गोष्टी करु नयेत

पाचट जाळण, पाचट शेताबाहेर काढण, पाचट एक आड एक सरीत ठेवण तसच उसाच्या बुडख्यावर पाचट ठेवण इत्यादी गोष्टी ऊस तोडणीनंतर करु नयेत.

उसाला रासायनिक खतांची मात्रा फेकून देऊ नये. अंतरबगला फोडण, जारवा तोडण, मशागत व मोठी बांधणी करण, पाण्याचा अतिरेक वापर करण टाळाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT