Musterd Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Rabbi Season : मोहरी लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान मोहरी पिकास पोषक आहे.

Team Agrowon

महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील (Rabbi Season) १० ते ३० अंश सेल्सिअस (ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी) तापमान मोहरी पिकास (Mustard Crop) पोषक आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा (Intercrop) मिश्र पीक (Mixed Crop) म्हणून घेण्यात येते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मोहरी लागवडीबाबत दिलेली माहिती पाहुया.

मोहरी लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. एसीएन- शताब्दी (एसीएन- ९) या जातीचे प्रति हेक्‍टरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. यात तेलाचे प्रमाण ३२ ते ४० टक्के असते. पुसा बोल्ड या जातीचे हेक्टरी ७ ते ११ क्विंटल उत्पादन मिळते. प्रति हेक्‍टरी पाच किलो बियाणे लागते. 

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. 

पेरणी ४५ सें.मी. बाय १५ सें.मी. अंतराने करावी. बियाणे आकाराने लहान असल्यामुळे मोहरीच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात सारखे पडण्यास मदत होते.

बियाणे तीन ते चार सें.मी. खोल ओलित पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. 

पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. 

निश्‍चित ओलिताची सोय असल्यास हेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. त्यापैकी पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व उरलेली अर्धी नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. 

निश्‍चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्यात. दोनच ओलिताच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असताना दुसरे ओलित करावे. 

एकच ओलित करणे शक्‍य असल्यास पीक फुलांवर असताना ओलित करावे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Decision: शेतकरी कर्जमाफीवर सरकार लवकरच निर्णय घेणार; बावनकुळेंची माहिती

Fruit Market: गुणकारी आवळ्याला ग्राहकांची मागणी वाढली

Rabi Sowing: धुळे जिल्ह्यात २३ टक्क्यांवर रब्बी पेरणी

Agricultural Import Policy: आयात धोरण शेतकरी, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे- कृषिमंत्री चौहान

Rabi Crop Competition: रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करा

SCROLL FOR NEXT