Chana Cultivation : हरभरा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

हरभरा लागवड करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे.
Chana Cultivation
Chana CultivationAgrowon

जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा (Available Moisture) उगवणी करिता फायदा करून घेण्याकरिता जमिनीची कमीत कमी मशागत करावी. 

पेरणीपूर्वी बियाणाला बुरशीनाशक लावावे तसेच रायझोबियम (Rhyzobium) व पीएसबी (PSB) ही जैविक खते (Organic Fertilizers) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. 

लहान आकारमानाच्या वाणाकरिता उदाहरणार्थ पीडीकेव्ही कांचण, विजय, विकास ५० ते  ६० किलो बियाणे लागते. 

मध्यम आकाराच्या वाणाचे पीडीकेव्ही कनक, जाकी ९२१८,  दिग्विजय, आकाश या जातींचे ७५ ते ८५  किलो बियाणे लागते. 

मोठ्या वाणाचे म्हणजेच काबुली वाणाचे १०० ते ११० किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. 

कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. ओलीताखालील हरभऱ्याची पेरणी १० नोव्हेंबर पर्यंत आटोपावी. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत पेरणी करायची असल्यास पेरणी करिता राज, विजय २०२  या वाणाची निवड करावी. 

Chana Cultivation
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे व्यवस्थापन

कोरडवाहू देशी हरभऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी बियाणे चार तास पाण्यामध्ये भिजवून पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी व नत्राची कमतरता भरून काढण्यासाठी शिफारशीत खताच्या मात्रे शिवाय २ टक्के युरीयाची पहिली फवारणी पीक फुलोरा अवस्थेत असताना व त्यानंतर दुसरी फवारणी १० दिवसांनी करावी.

हरभरा पिकाची पेरणी ३० सेंटीमीटर अंतरावर पाभरीच्या सहाय्याने करावी. पेरताना बियाणे पुरेशा ओलीत पडेल याची काळजी घ्यावी.

Chana Cultivation
शेळीपालन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पीक सुमारे ४५ दिवस तणमुक्त ठेवावे. हरभऱा पिकाला २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद व ३० किलो प्रति हेक्टर पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. 

जमिनीमध्ये जस्ताची कमतरता असल्यास २० किलो प्रती हेक्टर झिंक सल्फेट पेरणी सोबत द्यावे. हरभऱ्याला फुलोरा अवस्थेत असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत करावे. 

हरभरा वाण गुलक -१, पीकेव्ही काबुली २ व पीकेव्ही काबुली ४ या वाणांची पेरणी सरीवर वरंब्यावर ४५ सेंटिमीटर अंतरावर करावी. वरंब्यावर पेरणी केल्यामुळे उगवण चांगली होते. त्याचप्रमाणे ओलीत करण्यास सुद्धा सोयीचे होते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com