Sugarcane Pest Control Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane : उसावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण

सध्याच्या हवामानामुळे उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.प्रादुर्भावाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना फायदेशीर ठरतात.

टीम ॲग्रोवन

कांडी कीड ः

- अळी छिद्र तयार करून कांड्यामध्ये प्रवेश करते. छिद्र आपल्या विष्ठेच्या साहाय्याने बंद करते.

- प्रादुर्भावग्रस्त कांड्या आतून लाल होऊन पोकळ होतात.

नियंत्रणाचे उपाय:

- कांडी कीड प्रादुर्भावग्रस्त बियाणे वापरू नये.

- प्रति हेक्टरी परोपजीवी कीटक ट्रायकोग्रामा चिलोनीस तीन ते पाच लाख अंडी सोडावीत.

- हेक्टरी २५ फेरोमोन सापळे लावावेत.

- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी.

पायरिला ः

- पिल्ले पांढऱ्या रंगाची असून कंगव्या सारख्या दोन शेपट्या असतात. मोठे पायरिला तपकिरी रंगाचे असतात.

- किडीची बाल्यावस्था आणि प्रौढ अवस्था पानाच्या खालच्या भागातून रस शोषतात.

नियंत्रणाचे उपाय :

- प्रति हेक्टरी इपिरीकॅनिया परोपजीवी किटकांचे १००० कोष आणि १ लाख अंडी पानांवर सोडावीत.

परोपजीवी कीटक सोडलेल्या शेतात कीटकनाशकांची फवारणी करू नये.

- शेतात परोपजीवी कीटक नसल्यास, इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल.) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

पांढरी माशी ः

-प्रादुर्भावग्रस्त पाने अर्धवट पिवळी व काळ्या कोषांनी भरलेली आढळतात. त्यानंतर पाने कोरडी होतात.

-बाल्यावस्था पानाच्या खालील बाजूने रस शोषतात.

नियंत्रणाचे उपाय :

- खोडवा पिकास खतांचा शिफारशीत हप्ता वेळेवर आणि प्रमाणात द्यावा.

- जैविक कीटकनाशक बीव्हीएम (बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टीसिलीयम लेकॅनी आणि मॅटेरायझियम ॲनिसोप्ली) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

- क्रायसोपरला कारनी मित्र कीटकाची प्रति हेक्टरी २५०० अंडी किंवा अळ्या सोडाव्यात.

- अझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) ४ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

- इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल.) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

हुमणी

राज्यात माळावरील हुमणी (होलोट्रकिया सिरॅटा) आणि नदीकाठावरील हुमणी (लिकोफोलीस लिपिडोफ्लोरा) अशा दोन प्रजाती आहेत. ही कीड उसाची कांडी, मुळावर प्रादुर्भाव करते.

नियंत्रणाचे उपाय ः

-एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे.

-जैविक कीटकनाशक बीव्हीएम (बव्हेरिया, व्हर्टीसिलीयम आणि

मॅटेरायझियम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी.

-जैविक कीटकनाशक इपीएन (इन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड) २.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी.

-कडुनिंब, बाभळीच्या झाडावर इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

- फिप्रोनिल (४०%) अधिक इमिडॅक्लोप्रिड (४०%)संयुक्त कीटकनाशक ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त उसाच्या बुडालगत आळवणी करावी.

- लागवडीच्या वेळी फिप्रोनिल (०.३ % दाणेदार) २५ किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळावे.

संपर्क ः

-आर.जी.यादव, ९०११०६०६२२,

-डॉ.टी.डी.शितोळे, ९८९०३२०९८३

--------------------------------

(कीटकशास्त्र विभाग,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT