Cotton Boll Worm Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton :गुलाबी बोंड अळीसाठी एकात्मिक नियंत्रण करावे

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रण व व्यवस्थापनासाठी उपाययोजना एकात्मिक पद्धतीने राबवाव्यात, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील कृषी यंत्रणा तसेच शेतकऱ्यांना दिला.

टीम ॲग्रोवन

अकोला ः कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव (Boll Worm Outbreak On Cotton Crop) नियंत्रण व व्यवस्थापनासाठी उपाययोजना एकात्मिक पद्धतीने (Integrated Control Of Boll Worm) राबवाव्यात, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील कृषी यंत्रणा तसेच शेतकऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या एकात्मिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील कपाशीवर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग व प्रेसिंग मालकांनीही पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण व व्यवस्थापनाकरिता जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी एस. एस. शिंदे, एस. डी. जाधव, विलास वाशीमकर, मंडळ कृषी अधिकारी पी. ए. राऊत, जी. ए. राऊत, ए. एस. मेश्राम, सी. पी. नावकार, कृषी सेवक, जिनिंग व प्रेसिंग मिल मालक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी एकात्मिक व्यवस्थापन उपाययोजनांची माहिती दिली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा साठवलेल्या कापसातून होण्याची शक्यता असते. जिनिंग प्रेसिंगमध्ये साठवलेल्या कापसात जर बोंडअळीची अंडी शिल्लक राहिल्यास पोषक वातावरण मिळतेच. त्यांचे जीवनचक्र गतिमान होते.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग मिल, कापूस व्यापारी यांनी आपापल्या परिसरात एकात्मिक व्यवस्थापन करून योगदान द्यावे. आपापल्या जिनिंग प्रेसिंगमध्ये प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावावे. त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत. सरकीतील अळ्या व कोष नष्ट करणे, फेरोमेन सापळ्यातील ल्युर्स वेळचे वेळी बदलणे तसेच जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे अशा उपाययोजना राबवाव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT