Salam Kisan Agrowon
ॲग्रो गाईड

Organic Farming : सेंद्रिय शेती करायचीय? मग या गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात

Organic Carbon : सेंद्रिय शेती म्हणजे अशी वैविध्यपूर्ण शेती पद्धती की ज्यामध्ये पिके व पशुधन यांचे व्यवस्थापन शेतीवरील आणि स्थानिक उपलब्ध असलेल्या स्त्रोतांमधून एकात्मिक पद्धतीने केले जाते.

Team Agrowon

Organic Farming Practices : बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे आला.  सेंद्रिय शेती म्हणजे अशी वैविध्यपूर्ण शेती  पद्धती की ज्यामध्ये पिके व पशुधन यांचे व्यवस्थापन शेतीवरील आणि स्थानिक उपलब्ध असलेल्या स्त्रोतांमधून एकात्मिक पद्धतीने केले जाते.  

सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर वर्ज्य मानला जातो. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, संजीवके, विद्राव्य खते यांच्या ऐवजी पिकांच्या योग्य वाढीसाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते आणि जैविक घटकांचा वापर केला जातो. सोबतच मशागतीय पद्धती उदा. पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धती, सापळा पिकांची लागवड इ. या व्यवस्थापनामध्ये समावेश केला जातो. रासायनिक शेती पद्धतीचे रूपांतर पूर्णपणे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये करायचे झाल्यास साधारणत: ४ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. यामध्ये सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये उत्पादित मालासाठी सेंद्रियचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. मात्र पुढे ४ ते ६ वर्षांमध्ये शेतीचे पूर्ण सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यास सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र मिळू शकते. या प्रमाणपत्राच्या आधारे आपल्या शेती उत्पादनांची विक्री सेंद्रिय प्रमाणित उत्पादित माल स्वरूपामध्ये देश विदेशामध्ये विक्री करता येते. हे प्रमाणीकरण करण्यासाठी भारत सरकारने काही विशिष्ट यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक असते.

सेंद्रिय शेतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक? 

सेंद्रिय शेतीखाली आणायच्या एकूण क्षेत्राच्या एक तृतीयांश क्षेत्रावर वनशेती करणे क्रमप्राप्त असते. त्यात सुबाभूळ, गिरिपुष्प, शेवरी, शेवगा, हादगा, आपटा, बोर, आंबा, कडुनिंब, साग, सीताफळ, बांबू अशा वृक्षांची लागवड करून जैवविविधता जपावी लागते.

एक तृतीयांश क्षेत्रावर नगदी पिकांची लागवड करावी.

राहिलेल्या एक तृतीयांश क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची लागवड करावी.

या लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास प्रचलित शेतीमध्ये पिकांची जैवविविधता निर्माण होते. त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी पूरक असे सूक्ष्म वातावरण निर्मिती शक्य होते.

माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT