Tur crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Management : बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्याल?

कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन, कधी धुके तर कधी थंडी या वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे पिकामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजना कराव्यात.

Team Agrowon

हवामान अंदाजानूसार (Weather Report) मराठवाडयात दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरीएवढं ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

बाष्पोत्सर्जन आणि जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे. कधी ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तर कधी कडक ऊन, कधी धुके तर कधी थंडी या वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय.

त्यामुळे पिकामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजना कराव्यात.  

उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली

प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

ज्वारी पिकाला फुलोरा येण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणी नंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि  कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणी नंतर ९० ते ९५ दिवसांनी पाणी द्यावं.

उशीरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.  

गहू पिकाला कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणी नंतर ४० ते ४५ दिवसांनी व पिक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी पाणी द्यावं.

गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल (२५ % ईसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी ८ फेब्रुवारी पर्यंत करता येते.

वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी. 

कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड म्हणजेच खोडवा घेऊ नये. 

काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT