Azolla Agrowon
ॲग्रो गाईड

Azolla Production : जनावरांसाठी पशुखाद्य म्हणून अॅझोलाची निर्मिती कशी करावी?

अॅझोला ही वनस्पती निळे-हिरवे शेवाळ या प्रकारात मोडते. अॅझोला हे पाण्यात मुक्तपणे तरंगणा-या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील अॅझोलाचा वापर होतो.

Team Agrowon

अॅझोला ही वनस्पती निळे-हिरवे शेवाळ या प्रकारात मोडते. अॅझोला हे पाण्यात मुक्तपणे तरंगणा-या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील अॅझोलाचा वापर होतो.

याशिवाय जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून अॅझोलाचा वापर केला जातो. अॅझोलामध्ये तरंगत्या रूपांतरित खोडासहित द्विदलीय लहान लहान पाने आणि मुळांचा समावेश होतो.

जनावरांच्या आहारात अॅझोलाचा वापर केल्यामुळे दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. अॅझोलामध्ये अत्यावश्यक अमिनो अॅसिड, क्लोरोफिल अ आणि  ब, खनिजे, जीवनसत्त्वे, ब कॅरोटीन तसचं ३५ टक्के प्रथिने असतात. त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढते.

प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्के कमी होतो. दुभत्या जानावारासोबातच अॅझोला ब्रॉयलर तसेच लेअर कोंबड्यानाही योग्य मात्रेत दिल्यास उत्पादनात वाढ होते.

शेळ्या, मेंढ्या, वराह यांनाही अॅझोला पुरविल्यास त्यांची चांगली वाढ होते. अॅझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून कमी जागेत जास्त उत्पादन घेता येतं. प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही कमी आहे. 

अॅझोलाची निर्मिती कशी करावी?

झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेट चा वापर करून ३ मीटर X ३ मीटर आकाराचा १२ इंच खोल खड्डा करावा. चहुबाजूने विटांचा थर द्यावा. अॅझोला ३१ अंश सेल्सिअस तापमानावर तग धरत नाही. त्यामुळे तापमाना संदर्भात विशेष काळजी घ्यावी.

खड्ड्यावर ३.५ मीटर आकाराचा प्लॅस्टिकचा पेपर अंथरावा.

या प्लॅस्टिक पेपरवर साधारण ८ ते १० किलो गाळ होईल अशी माती, त्यात २ किलो शेण व ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे.

खड्ड्यामध्ये ५ ते ६ इंचापर्यंत पाणी भरावं.  

खड्ड्यामध्ये ५०० ग्रॅम अॅझोला कल्चर टाकावं. साधारण १० ते १५ दिवसात खड्ड्यातील पाण्यावर अॅझोलाची वाढ झालेली दिसून येते.

या खड्यातून साधारण दररोज ५०० ग्रॅम अॅझोला मिळतो. तो चाळणीने गाळून घ्यावा.

साधारण २ ते ३ महिन्यांनंतर खड्ड्यातील पाणी व माती बदलावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT