Humani Control Agrowon
ॲग्रो गाईड

Humni Control : खरीपातील हुमणीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा?

Humni Management : गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो.

Team Agrowon

White Grub Control : गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा (White Grub Pest) प्रादुर्भाव वाढत आहे. खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो.

बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भावही वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

हुमणीच्या अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते.

संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी असते. हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात.

त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या च्या काळात हुमणीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणात अढळतात. त्यामुळे हुमणीचे सामुदायीक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी

पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. दोन नांगरटी केल्यास ७० टक्के हुमणीचे नियंत्रण होते.

किटकनाशकाची फवारणी करुन बाभूळ, कडूनिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात. रात्री भुंगेरे फांद्यावरील पाने खाल्ल्यामुळे मरुन जातील.

शेतात ठिकठिकाणी प्रकाश सापळे लावल्यास प्रौढ भुंगेऱ्याचे प्रभावी नियंत्रण होते.

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत. यामध्ये बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी हुमणीचा फडशा पाडतात. तर मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. बॅसीलस पॉपीली हे जिवाणू व हेटरो-हॅब्डेटीस हे सूत्रकृमी होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

हुमणीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक एकरी ८ ते १० किलो या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.

ड्रेंचिंग करुन हुमणीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येते. अशाप्रकारे सध्याच्या काळात हुमणीच्या भुंगेऱ्याचे नियंत्रण केल्यास पुढील काळात हुमणीचा प्रादुर्भाव कमी करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT