Humni Control : हुमणीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कोणत्या आहेत?

Team Agrowon

हुमणी किडीचा वाढता प्रादुर्भाव

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो.

Humni Control | Agrowon

खोल नांगरट

जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. दोन नांगरटी केल्यास ७० टक्के हुमणीचे नियंत्रण होते.

Humni Control | Agrowon

भुंगेऱ्याचे नियंत्रण महत्वाचे

हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या च्या काळात हुमणीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणात अढळतात. त्यामुळे हुमणीचे सामुदायीक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Humni Control | Agrowon

बागायती क्षेत्रात प्रादुर्भाव जास्त

बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भावही वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

Humni Control | Agrowon

अळी अवस्था सर्वात नुकसानकारक

हुमणीच्या अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते. संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी असते.

Humni Control | Agrowon

भुंगेऱ्यांचा नायनाट

पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

Humni Control | Agrowon

नैसर्गिक शत्रू महत्वाचे

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत. यामध्ये बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी हुमणीचा फडशा पाडतात. तर मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. बॅसीलस पॉपीली हे जिवाणू व हेटरो-हॅब्डेटीस हे सूत्रकृमी होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

Humni Control | Agrowon
Moringa Cultivation | Agrowon
आणखी पाहा...