Cotton Disease  Agrowon
ॲग्रो गाईड

Cotton Disease : कपाशी रोपांची मर कशी रोखायची?

Diseases of Cotton : सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. बऱ्याच ठिकाणी कापाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

Team Agrowon

Cotton Wilt : सध्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. बऱ्याच ठिकाणी कापाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते. कपाशीची अचानक मर होण्याची कारणे काय आहेत आणि अशावेळी कोणते उपाय करायचे?

कापसातील मर ही दोन प्रकारची असते एक बुरशीजन्य मर आणि दुसरी म्हणजे आकस्मिक मर. जेंव्हा जास्त पाऊस पडतो त्यावेळी शेतात पाणी साठून राहतं आणि बुरशी तयार होते अशा वेळी बुरशीजन्य मर रोगाची लक्षणे दिसून येतात. तर दुसऱ्या प्रकारात पावसाच्या मोठ्या खंडानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीची झाडे अचानक जागेवर सुकू लागतात.

कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये जास्त दिवस पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेलं असतं. अशावेळी पिकाला पाणी दिल्यास किंवा मोठा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकतं आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सध्या बऱ्याच ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. अशा ठिकाणी शेतात पाणी साठून राहिल्यामुळे कपाशीमध्ये फ्युजॅरियम बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. या बुरशीमुळे झाड सुकते आणि पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात. या बुरशीचा प्रादुर्भाव एका झाडापासून दुसऱ्या झाडाला होतो. त्यामुळे कपाशीच्या शेतात ठिकठिकाणी मर झालेल्या झाडांचा पट्टा तयार होतो.

शेतात झाले सुकलेली दिसताच शेतात साठलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. प्रादुर्भाव जर कमी प्रमाणात असेल तर २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रत्येक झाडाला १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या शेजारच्या झाडालाही आळवणी करावी. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखता येईल. प्रादुर्भाव जर जास्त असेल तर प्रत्येक झाडाला आळवणी करण शक्य होत नाही. अशावेळी २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाचे नोझल काढून प्रत्येक झाडाच्या मुळाशी टाकावे. लक्षात ठेवा या द्रावणाची फवारणी करायची नाही. या उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT