Jinger Processing Agrowon
ॲग्रो गाईड

Jinger Processing : आल्यापासून सुंठ कशी तयार करायची?

आल्यापासून पावडर, तेल, कॅण्डी, बिअर, पेस्ट अशा प्रकारच्या प्रक्रिया पदार्थांची निर्मिती होते. गुणधर्मामुळे औषधात वापर होतो, मात्र यास मर्यादा आहे.

Team Agrowon

भारतीय आले पीक (Jinger Crop) आपल्या श्रेष्ठ गुणधर्माकरिता ओळखले जाते. अन्न, औषध, मसाला आणि विविध प्रक्रियेत आल्याचा वापर होतो.

याशिवाय, जगात उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असूनही केवळ प्रक्रिया उद्योगाला चालना आणि संशोधनाची वाणवा असल्याने आले उत्पादन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

जगात चीन आले पिकाचे सर्वाधिक उत्पादन (Jinger Production) घेतो, भारताचा दुसरा क्रमांक असून, देशांतर्गत उत्पादनात आसाम सर्वाधिक, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे.

आल्यापासून पावडर, तेल, कॅण्डी, बिअर, पेस्ट अशा प्रकारच्या प्रक्रिया पदार्थांची निर्मिती होते. गुणधर्मामुळे औषधात वापर होतो, मात्र यास मर्यादा आहे.

ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर आल्यावर प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते.

सुंठ पावडर देखील उत्तम आरोग्यदायी असते. आयुर्वेदीक औषध निर्मिती तसच विविध मसाल्यांमध्ये सुंठ पावडर ला चांगली मागणी आहे.

महिला बचत गटामार्फत किंवा घरगुती व्यवसाय म्हणून आल्यापासून सुंठनिर्मिती व्यवसाय हा चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करायची याबद्दल. 

आल्यापासून सुंठ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुंठ निर्मितीसाठी उत्तम प्रतीचे आले निवडावे. आले स्वच्छ करून ८-१० तास पाण्यात भिजत ठेवावे. 

भिजलेल्या आल्याची साल काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवावे. 

नंतर एका छोट्या बंद खोलीत आले कंद पसरून १२ तास गंधकाची (प्रमाणः १० ग्रॅम) धुरी द्यावी. 

कंद बाहेर काढून पुन्हा २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवून १२ तास गंधकाची धुरी द्यावी. 

अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. 

प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशात १० टक्के पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवावे. तयार सुंठ स्वच्छ करून विक्री करावी.         

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT