Bordo Paste Agrowon
ॲग्रो गाईड

Bordo Paste : बोर्डो पेस्ट कशी तयार करावी?

फळझाडांना रोगामुळे होणाऱ्या जखमांना लावण्यासाठी बोर्डोपेस्ट चा उपयोग होतो. झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावल्यामुळे बुरशीचा वनस्पतीच्या जखमांवर हल्ला होत नाही.

Team Agrowon

फळझाडांना रोगामुळे होणाऱ्या जखमांना लावण्यासाठी बोर्डोपेस्ट चा उपयोग होतो. झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावल्यामुळे बुरशीचा वनस्पतीच्या जखमांवर हल्ला होत नाही.

फळझांडांमध्ये छाटणी करताना किंवा झाडांना आकार देण्यासाठी फांद्या कापाव्या लागतात. छाटणी झाल्यावर किंवा फांद्या कापल्यावर झालेल्या जखमेच्या ठिकाणापासून हानिकारक सुक्ष्म जीवांची लागण होण्याची भिती असते.

अशा जखमेच्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावल्यास झाडाचे रोगांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होते. 

लिंबुवर्गीय फळझाडांवरील डिंक्या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता बोर्डोपेस्ट पेस्ट लावण्याची शिफरस करण्यात आलेली आहे.

फळझाडांना जमिनीपासून वर १ मिटर उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट वर्षातून दोन वेळा पावसाच्या आधी (जूनमध्ये) आणि पावसाळ्यानंतर (ऑक्टोबरमध्ये) लावावी.

बोर्डो पेस्ट कशी तयार करावी?

१ किलो मरचूद घ्यावे आणि त्याची बारीक पूड करावी. ५ लिटर पाण्यात प्लॅस्टिक च्या बादलीत विरघळून घ्यावा. 

दुसऱ्या बादलीत ५ लिटर पाणी घेऊ त्यात १ किलो कळीचा चुना विरघळून घ्यावा.दोन्ही द्रावण एकाचवेळी तिसऱ्या बादलीत ओतावे आणि लाकडी काठीने ढवळावे. 

एकत्रित झालेले सर्व घटक पेस्ट स्वरुपात तयार होतील हे मिश्रण म्हणजे बोर्डो पेस्ट होय. घट्ट द्रावण ब्रश अथवा कुचीच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याला लावावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farmer Challenges: पांढऱ्या सोन्याची शोकांतिका

Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली

Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन

Job Recruitment Policy: नोकरी देताना भरती नियमांचे पालन आवश्‍यक

Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दर वाढ स्थगित

SCROLL FOR NEXT