Food Adulteration Agrowon
ॲग्रो गाईड

Food Adulteration ...अशी ओळखा अन्नपदार्थांतील भेसळ

अन्नपदार्थांमध्ये विविध घटकांचा वापर करून भेसळ केली जाते. भेसळयुक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अपायकारक पदार्थांची भेसळ केल्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा खालावतो.

करिश्मा कांबळे

अन्नपदार्थांमध्ये विविध घटकांचा वापर करून भेसळ (Food Adulteration) केली जाते. भेसळयुक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अपायकारक पदार्थांची भेसळ केल्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा (Food Quality) खालावतो. भेसळ करण्यासाठी लहान मोठे दगड, खडू भुकटी, लाकडाचा भुसा, अखाद्य रंग यांचा वापर होतो. हे टाळण्यासाठी अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (How to Find Food Adulteration)

अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंध कायदा १९५४ मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्याचा प्रमुख उद्देश अन्नपदार्थांतील भेसळ रोखणे आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ लोकांच्या आहारात येऊ नयेत असे आहे. घरगुती स्तरावर काही टिप्स वापरून अन्नपदार्थात होणारी भेसळ ओळखता येते. त्याविषयी माहिती घेऊ.

अन्नघटकांमध्ये होणारी भेसळ ः

- अन्नपदार्थांतील उपयुक्त घटक काढून घेणे.

- अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे.

- मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरून अन्नपदार्थ तयार करणे.

- सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ अन्नपदार्थात मिसळणे.

- अन्नपदार्थ तयार करताना मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात अयोग्य रंग मिसळणे.

- पदार्थांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश मिसळणे.

- प्रमाणित गुणवत्तेपेक्षा कमी प्रतीचा माल अन्नपदार्थांमध्ये वापरणे.

अन्नभेसळ ओळखण्याच्या पद्धती ः

१) दुधातील भेसळ ः

दुधामध्ये प्रामुख्याने पाणी, मक्याची पीठ, साखर, मैदा, निरमा पावडर यासारख्या पदार्थांची भेसळ केली जाते. असे भेसळयुक्त दूध सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

अ) पाणी घातलेले दूध ः

एका स्टीलच्या पसरट ताटामध्ये एका बाजूस भेसळमुक्त चांगल्या दुधाचा १ थेंब आणि दुसऱ्या बाजूस पाणी घातलेल्या भेसळयुक्त दुधाचा १ थेंब टाकावा. त्यानंतर ताट थोडे तिरके करावे. भेसळयुक्त दुधाचा थेंब लवकर खाली घसरत जाऊन एकदम पांढरा फिक्कट रंग होईल. तर भेसळमुक्त दूध लगेच घसरणार नाही आणि त्याचा रंग थोडासा पांढरा गडद दिसेल.

ब) निरमा पावडर ः

एक ग्लासमध्ये भेसळमुक्त दूध तर दुसरा ग्लासमध्ये निरमा पावडर मिसळलेले भेसळयुक्त घ्यावे. दोन्ही ग्लास अर्ध्यापर्यंत दुधाने भरून घ्यावेत. ग्लासावर प्लेट ठेवून ग्लास हलकासा हलवून घ्यावा. भेसळयुक्त दुधाचा फेस ग्लासमध्ये वरील बाजूस दिसून येईल. तर भेसळमुक्त दुधाला फेस येणार नाही.

२) हळद पावडर ः

- हळद पावडरमध्ये बऱ्याचदा खडू पावडर किंवा स्टार्च मिसळून भेसळ केली जाते.

कसे ओळखायचे ः

पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचा हळद पावडर व्यवस्थित मिसळून हलवून घ्यावा. पाण्यामध्ये हळद विरघळून भेसळयुक्त हळद जास्त प्रमाणात पिवळा दिसते. तर भेसळमुक्त हळदीचे पाणी फिक्कट पिवळा रंग राहते.

३) साखर व गूळ ः

- साखर व गुळामध्ये बऱ्याचदा खडूची पावडर किंवा खाण्यायोग्य नसलेल्या पिवळ्या रंगाची भेसळ केली जाते.

कसे ओळखायचे ः

एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर साखर किंवा गूळपावडर मिसळून विरघळून घ्यावी. हा ग्लास न हलवता थोडा वेळ स्थिर ठेवा. खडू भुकटी किंवा पावडरची भेसळ असल्यास ती ग्लासाच्या तळाला जमा होईल.

४) मध ः

मधामध्ये बऱ्याचदा साखरेचा पाक मिसळून भेसळ केली जाते.

कसे ओळखायचे ः

ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर मध मिसळावा. शुद्ध मध ग्लासातील पाण्याच्या तळाला राहून पाण्यामध्ये विरघळत नाही. तर भेसळमुक्त मध पाण्यामध्ये पसरतो.

५) खोबरेल तेल ः

खोबरेल तेलामध्ये इतर प्रकारचे तेल मिसळून भेसळ केली जाते.

कसे ओळखायचे ः

पारदर्शक छोट्या बाटलीमध्ये खोबरेल तेल भरून ते फ्रीजमध्ये ठेवावे. शुद्ध खोबरेल तेल घट्ट होईल. तर बाकीचे भेसळयुक्त पदार्थ वेगळ्या थरात जमा होतील.

६) लोणी ः

लोण्यामध्ये डालडा, वनस्पती तूप किंवा कुस्करलेला बटाटा मिसळून भेसळ केली जाते.

कसे ओळखायचे ः

मेडिकल दुकानामध्ये मिळणारे टिंक्चर आयोडीनचे २ ते ३ थेंब लोणीमध्ये मिसळावे. त्यानंतर लोण्याचा रंग निळा झाला तर ते भेसळयुक्त समजावे.

- करिश्मा कांबळे, ८४५९३७४६८४ (अन्न तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT