Soybean Mosaic Disease Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

मराठवाड्यातील बऱ्याच भागात विशेषत: उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (Soybean Mosaic Disease) म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर पिकावर नांगर फिरवावा लागत आहे. हा रोग विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगामुळे सोयाबीन उत्पादनात १५ ते ७५ टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी या रोगावर पुढील उपाययोजनांची शिफारस केली आहे.

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटकाद्वारे होतो.

एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?

  • पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

  • वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

  • रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथॉक्झाम (२५ टक्के) 2 ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.

  • फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.

  • नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.

  • कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावं.

  • पावसाचा ताण पडल्यास पिकाला संरक्षित पाणी द्यावं.

  • बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.

  • पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.


अधिक माहितीसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांशी ०२४५२-२२९००० या क्रमांकावर संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT