Kharif Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Kharif Crop Management : पूर्व हंगामी किड नियंत्रणाने रोखा खरिपात येणाऱ्या किडींना

Integrated Pest Control : एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पूर्व हंगामी किड नियंत्रण करणं ही कीड नियंत्रणाची प्रभावी पद्धत आहे. पूर्व हंगामी किड नियंत्रण म्हणजे काय? तर हंगामाच्या सुरुवातीलाच विविध मशागती करुन पिकातील किडींना आटकाव करणे. एकात्मिक व्यवस्थापनाच्या विविध मशागतीकेल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होते.

Team Agrowon

Pest Control : गेल्या काही वर्षात रासायनिक कीटकनाशकांचा होणारा अतिरेकी वापर हा किडींचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतोय. किडींमध्ये किटकनाशकांबाबत निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, दुय्यम किडींचा होणारा उद्रेक, मित्र किटकांची कमी होत चाललेली संख्या अशा परिस्थितीत वेळोवेळी शेतात निरीक्षण करून एकात्मिक किड नियंत्रणाचे विविध उपाय करावेत. त्यामुळे अनावश्यक फवारणी आणि त्यावरील खर्चात बचत होते.

एकात्मिक कीड नियंत्रणाच्या दृष्टीने पूर्व हंगामी किड नियंत्रण करणं ही कीड नियंत्रणाची प्रभावी पद्धत आहे. पूर्व हंगामी किड नियंत्रण म्हणजे काय? तर हंगामाच्या सुरुवातीलाच विविध मशागती करुन पिकातील किडींना आटकाव करणे. एकात्मिक व्यवस्थापनाच्या विविध मशागतीकेल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होते.

मशागतीमध्ये शेतात पिकाची फेरपालट करणं ही जुनी आणि पारंपारिक पद्धत आहे. त्यामुळे किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचं नैसर्गिकपणे नियंत्रण मिळविण्यास मदत होते.

पिकाचा हंगाम संपल्याबरोबर पिकाचे अवशेष, पऱ्हाट्या, तुराट्या यांचा पावसाळ्यापूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्ट साठी त्याचा वापर करावा. अन्यथा त्यावर किडींच्या विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते.

शेताची तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. म्हणजे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्षांद्वारे नष्ट होतील.

पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे. जेणेकरून किडीची पहिली पिढी तणांवर तयार होऊ शकणार नाही.

येत्या खरीप हंगामासाठी तुम्ही जर घरचं बियाणं वापरणार असाल तर बियाण्यास चाळणी लावून किडके, अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचं प्रमाण ठरवून ठेवावं.

उपलब्धतेनुसार कीड, रोग प्रतिकारक वाणाचा वापर करावा. बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकाची लागवड करावी. कारण पावसात खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकाची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय कपाशी आणि इतर पिके हंगामा बाहेर घेणं टाळावं. चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. माती परीक्षण करूनच खताचा त्याप्रमाणे वापर करावा. नत्र खताचा अतिवापर करणं टाळावं. हंगामात वेळोवेळी आंतरमशागत करावी त्यामुळे किडीला पुरक अशा तणाचा नाश होतो. अशा प्रकारे मशागतीय पद्धतीचा अवलंब करुन पिकातील किडींना आटकाव करणं शक्य होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT