Lemon Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Lemon Farming : लिंबू बागेतील हस्त बहाराचे नियोजन कसे कराल?

कागदी लिंबाच्या झाडाला वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरु असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे याकाळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते.

Team Agrowon

कागदी लिंबाच्या (Paper lemon) झाडाला वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरु असते. मात्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबू फळास आधी भाव मिळतो. त्यामुळे याकाळात लिंबू फळांची आवक वाढविण्यासाठी हस्त बहाराचे नियोजन करणे महत्वाचे असते. बागायतदारांचा कल हस्त बहार घेण्याकडे जास्त असतो. पण हा बहार सहज घेता येत नाही. कारण लिंबूवर्गीय फळ झाडामध्ये साधारणतः आंबिया बहार ६० टक्के, मृग बहार ३० टक्के तर हस्त बहार फक्त १० टक्के येतो. हस्त बहार घेण्याकरिता शास्त्रिय दृष्टीकोन ठेवून मशागत, खत व्यवस्थापन आणि संजीवकाचा उपयोग करुन हमखास बहाराची फुले आणणे गरजेचे आहे.

लिंबू पिकामध्ये आंबिया, मृग आणि हस्त बहार असे तीन बहार घेतले जातात. यापैकी हस्त बहारात घेतल्या जाणाऱ्या बहाराच्या फळांना जास्त भाव मिळतो. कारण या बहाराची फळे एप्रिल - मे महिन्यात काढणीस येतात. या काळातच लिंबू फळांना जास्त मागणी असते. साधारणपणे १५ किलो कागदी लिंबाच्या फळांना एका कट्याला आंबिया बहाराच्या फळांना १०० ते १२० रुपये, मृग बहाराच्या फळांना २०० रुपये तर हस्त बहाराच्या फळांना ५०० ते ६०० रुपये भाव मिळतो. म्हणजेच हस्त बहाराच्या फळांना आंबिया बाहाराच्या फळांपेक्षा ५ ते ६ आणि मृग फळांपेक्षा ३ पट जास्त भाव मिळतो. म्हणून हस्त बहार घेणे जास्त फायदेशीर आहे.

हस्त बहार कसा घ्यावा ?

हस्त बहार घेण्याकरिता लिंबू झाडावर मृग बहाराची फळे नसावीत. याकरीता लिंबू झाडावर मृग बहार येण्याची सवय लावणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित हस्त बहार येत राहील, मृग बहाराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. हस्त बहार घेण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाने केलेल्या प्रयोगानूसार पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

- १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पाण्याचा ताण द्यावा.

झाडे ताणावर सोडताना सायकोसील (१००० पीपीएम) या संजीवकाची २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास १५ दिवसांनी हीच फवारणी पुन्हा करावी.

ऑक्टोबर महिन्यात ताण तोडताना पोटॅशियम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. नत्र खताची अर्धी तसेच पालाश व स्फुरद खताची पूर्ण मात्रा ३००:३००:३०० ग्रॅम प्रति झाड द्यावी. उरलेला अर्धा नत्र एका महिन्याने किंवा फळे वाटाण्या एवढी झाल्यावर द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून

Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी

Sindhudurg Heavy Rain: समुद्रात वादळी स्थिती, देवगडबंदरात शेकडो नौका आश्रयाला

Flood Relief: मदतीबाबत ‘काथ्याकूट’

Farmer Death: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ

SCROLL FOR NEXT