Rural Development
Rural Development Agrowon
ॲग्रो गाईड

Rural Development : दुर्गम वाड्या, वस्त्यांची ‘दिशांतर’ची साथ कशी मिळाली ?

राजेश कळंबटे

वेहेळे-राजवीर वाडीतील संध्याकाळची वेळ...

दिशांतर संस्थेचे सदस्य आणि वाडीतील लोकांचा ग्रामविकासाबाबत चाललेला संवाद...

आम्ही आजही पारंपरिक पद्धतीने भातशेती करतोय. उन्हाळी शेतीचा काहीच संबंध नाही, कारण एका रात्रीत उनाड जनावरे शेती उद्‍ध्वस्थ करतात. जोडीला वानरे, डुकरांचा त्रास आहेच... यामुळेच आम्ही गुरे सोडली आणि हळूहळू शेतीही कमी होतेय. युवा वर्ग गाव सोडून चाललाय... गावात पहिले सतरा नांगर होते, आता एकच राहिलाय... कशाने शेती करणार? तुम्हीच सांगा...

अशा परिस्थितीही संस्थेच्या सदस्यांनी जिद्द न सोडता गावकऱ्यांसमोर शेती आणि शाश्‍वत ग्राम विकासाची दिशा स्पष्टपणे मांडली. लोकांना हे पटले आणि प्रायोगिक तत्त्वावर गावकऱ्यांनी एकमेकांच्या साथीने हिवाळी, उन्हाळी शेती करण्याची तयारी दर्शविली आणि पुढे हेच गाव आता इतरांसाठी दिशादर्शक बनलं आहे. या मागे दिशांतर संस्थेचे अथक प्रयत्न आहेत.

‘दिशांतर'चे अध्यक्ष राजेश जोष्टे यांचे मूळ गाव गुहागर तालुक्यातील तवसाळ. वडील गेल्यानंतर आबलोली या आजोळी ते राहायचे. आजीकडील परिस्थिती गरिबीची. पण त्यांच्याकडे तेवढेच दातृत्वही होते. दिवाळीमध्ये घरात बनवण्यात येणारा फराळ गावातीलच बहुजन समाजाच्या वस्तीत वाटण्याची शिकवण आजीकडूनच मिळालेली. त्यामुळे समाजकार्याचे संस्कार कळत नकळत लहानपणीच मनावर झाले. पुढे डीएडपर्यंत शिक्षण झाले.

लिखाणाची आवड दहावीपासून होती. आपसूकच पत्रकारितेची ओढ लागली. गुहागरमधून चिपळूणला रहायला आल्यानंतर वार्तांकनासाठी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फिरण्याची संधी राजेश यांना मिळाली. यानिमित्ताने वाडीवस्तीवरील परिस्थिती पाहायला मिळत होती. त्यांची दुरवस्था कागदावर उतरत होती. त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी फक्त लिखाण उपयोगी नाही, त्यासाठी स्वतः काहीतरी करायला हवे याची जाणीव झाली. जवळचे नातेवाईक, मित्र परिवाराकडील स्वच्छ कपडे, त्यांच्या मुलांची दप्तरे, पाट्या असे शैक्षणिक साहित्य गोळा करून वंचित वाडीवस्तीवरील कुटुंबांना देण्यास त्यांनी प्रारंभ केला. तेथूनच खऱ्या अर्थाने ‘भारत सेवक' या गटाची सुरुवात झाली. कोणताही लेखाजोखा करण्याच्या फंदात न पडता मिळेल तशी मदत करण्यावर त्यांचा भर होता.

सामाजिक, शैक्षणिक उपक्रम ः

‘भारत सेवक’ या गटाचेच रूपांतर २०१२ मध्ये ‘दिशांतर’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये झाले. चिपळूण तालुक्यातील खलिपा वाडीत जाण्यासाठी पाच टेकड्या पार कराव्या लागत होत्या. एखाद्या माणसाला आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला तर डोलीतून आणणे हाच एकमेव पर्याय होता. तेथे दिशांतर पोहोचली आणि कामांना सुरुवात केली. दुर्गम भागातील वस्तींवर ‘आधार’ कार्ड नोंदणी करणे, झिरो बँक बॅलन्सवर लोकांची बँक खाती काढून देणे यांसारखी कामे दिशांतरने केली. हे करतानाच शैक्षणिक सुविधांची वानवा समोर आली....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT