Orange Crop Management : संत्रा बागेतील कीड, रोग, खत व्यवस्थापन

संत्रा बागेत रोज संध्याकाळी वाळलेल्या गवताचा धूर करावा त्यामुळे फळातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मदत होईल.
 Orange Crop
Orange CropAgrowon

हवामान अंदाजानूसार विदर्भात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार संत्रा, भाजीपाला पिकामध्ये व्यवस्थापनात पुढील बदल करावेत.  

संत्रा बागेत (Orange Crop) रोज संध्याकाळी वाळलेल्या गवताचा धूर करावा त्यामुळे फळातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मदत होईल. रस शोषण करणाऱ्या (Sucking Pest) किडींच्या सर्वेक्षणासाठी बागेत  प्रकाशसापळे लावावेत. 

 Orange Crop
Rabi Sowing : रब्बी हंगामासाठी अनुदानावर मिळणार बियाणे

संत्रा फळावरील तपकिरी रॉट रोगाच्या नियंत्रणासाठी फॉसीटाईल (८० टक्के डब्ल्यू पी) २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झीक्लोराइड (५० टक्के डब्ल्यू पी) २५ ग्रॅम किंवा कॅप्टन (७५ टक्के डब्ल्यू पी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमिनीवर पडलेली फळे ताबडतोब उचलून नष्ट करावीत. 

संत्रा व मोसंबीच्या मृग बहाराची फळे वाटाण्या एवढी झाल्यावर शिफारशी प्रमाणे नत्र खताची मात्रा द्यावी. आंबीया बाहाराच्या संत्रा बागेत फळगळ कमी होण्याकरिता पाऊस पडल्यानंतर जीब्रेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यू पी) प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून स्वच्छ वातावरण असताना फवारणी करावी. 

 Orange Crop
उगवणक्षमता तपासून घरचे बियाणे पेरावे

गादीवाफ्यावर कांदा बियाणे १० किलो पेरावे. पांढऱ्या कांद्याची लागवड करायची असेल तर अकोला सफेद, फुले सफेद, यशोदा, भीमा, श्वेता, पुसा व्हाईट राऊंड या पैकी एका वाणांची निवड करावी. लाल कांद्याची लागवड करायची असेल तर पुसा रेड, एन - २४१, निफाड - ५३, बसवंत - ७८० या पैकी एका वाणांची निवड करावी. 

रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या वांगी, टोमॅटो, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, गाजर, मुळा, दुधीभोपळा, शिरीभोपळा इत्यादी पिकांची लागवड करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com