Wild Vegetables
Wild Vegetables Agrowon
ॲग्रो गाईड

Wild Vegetable : आरोग्यदायी सुरण, पाथरी, तांदुळजा

डॉ.प्रणिता कडू

चिवळ/चिवळी

स्थानिक नाव : चिवचो, घोळाची, चिगळाची भाजी

उपयुक्तता ः

 या भाजीत अनेक पोषक घटक जीवनसत्त्व अ, खनिजे आणि तंतूमय घटक मोठ्या प्रमाणात असतात. १०० ग्रॅम भाजीमध्ये १२० आय.यु. जीवनसत्त्व अ मिळते.

 त्वचा आणि डोळ्यांच्या विकारासाठी उपयुक्त आहे.

 भाजी शितल असून रक्त शुध्द करते. रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवते.

 मूळव्याध, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग मधुमेह, संधीवात इतर आजारांवर घोळ भाजी गुणकारी आहे.

 कमी कॅलरी असणाऱ्या या भाजीत फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य टक्के असते.

 भाजी अन्न पचनास मदत करते, यकृताचे कार्यही सुधारते

 ओमेगा फॅटी अॅसिडचे प्रमाण घोळ भाजीत इतर कोणत्याही भाज्यांच्या मानाने सर्वात जास्त असते. १०० ग्रॅम घोळीच्या भाजीत ३५० ग्रॅम ओमेगा फॅटी ॲसिड असते.

पाथरी

स्थानिक नाव : पाथरी

उपयुक्तता :

 अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतीणीचे दूध वाढते.

 कोरड्या खोकल्यामध्ये याचे चाटण उपयुक्त आहे.

 पित्तशमन करणारे असून रक्त शुध्दीसाठी उपयुक्त. त्यामुळे त्वचेचे आजार व अशक्तपणा दूर होतो.

 कावीळ व यकृत विकारात भाजी उपयुक्त आहे.

कुरडू

स्थानिक नाव : कुरडू, सीलगोटी, कोंमडा

उपयुक्तता :

 बिया औषधात वापरतात.

 बिया, थंड, शीतल, स्नेहन करणाऱ्या व पौष्टिक गुणधर्माच्या आहेत.

 बियांचा फाटा जुलाबात देतात.

 निद्रानाशात झोप येण्यासाठी बियांची भाजी करून देतात.

तांदुळजा

स्थानिक नाव : तांदुळजा, चवळीची भाजी

उपयुक्तता :

 ताप, टायफॉईड, मलेरिया आजारांमध्ये तोंडाची चव गेलेल्या रुग्णाला ही भाजी आवर्जून देतात. ही भाजी खाल्ल्याने भूक अतिशय चांगली लागते.

 ताप आल्यावर भाजी खाल्ल्यास ताप कमी होतो. ताप, चक्कर यावर ही भाजी गुणकारी आहे. तांदुळजाचा रस काढून पिल्याने पोटाचे विकार कमी होतात.

 शरीरात जीवनसत्त्व क ची वाढ करते.

 गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.

 विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.

 उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.

 डोळ्यांच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीकरीता फार उपयुक्त आहे.

आंबुशी

स्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, भुईसर्पटी

उपयुक्तता :

 उष्ण व रुक्ष असून पचनास हलकी व भुकवर्धक आहे.

 रसाने रक्तस्राव बंद होतो.

 आमांश आजारावर उपचार करताना आंबुशीची पाने वापरतात.

 चामखिळीमध्ये पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते.

 केसतुडीवर उपाय म्हणून पानाचे पोटीस बांधतात.

मायाळू/वावडिंग

स्थानिक नाव :- मायाळू, वावडींग

उपयुक्तता :

 शीतल व स्नेहन आहे.

 तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, विरेचक व भूक वर्धक आहे.

 कफकारक, पौष्टिक आहे.

भारंगी

स्थानिक नाव : भारंगी

उपयुक्तता :

 मूळ, ज्वर किंवा कफ असलेल्या रोग्यास देतात.

 कफ वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांवर भारंग मूळ प्रामुख्याने वापरतात.

 पानाची भाजी दमा होऊ नये म्हणून उपयुक्त आहे.

 पोटातील कृमी दूर करून पोट साफ करण्यासाठी भाजी उपयुक्त आहे.

कडवंची

उपयुक्तता :

 फळं (शेंग) पोटाच्या विकारावर, यकृत व प्लिहा या अवयांच्या बिघडावर, मधुमेहावर गुणकारी आहेत.

 मधुमेही लोक कच्ची कवडंची खाण्यास प्राधान्य देतात. कवडंचीचा कंद (गड्डा) गर्भपातक आहे.

चंदन बटवा

स्थानिक नाव : चंदन बटवा

उपयुक्तता :

 बध्दकोष्ट, पोटामध्ये गॅसेस, अपचन या समस्यांकरीता गुणकारी.

 भाजीमध्ये अ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.

 पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.

 सांधेदुखी किंवा स्नायू वेदना दूर होण्यास मदत होते.

सुरण

स्थानिक नाव : सुरण

उपयुक्तता : पाने, कंद, मुळ उपयुक्त असून औषधी आहेत.

 सुरणात अ, ब, क ही जीवनसत्त्वे आहेत.

 पचनसंस्थेसाठी अतिशय उपयुक्त. मूळव्याधीवर सर्वोत्तम समजले जाते.

 आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे.

 कफ, वात, दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांसारख्या दोषांवर भाजी उपयोगी आहे.

- डॉ.प्रणिता कडू,

८६०५३०८९१३

(कृषी विज्ञान केंद्र, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT