Mango Agrowon
ॲग्रो गाईड

लासलगावमार्गे ‘हापूस’ अमेरिकेला रवाना

पहिल्या कंटेनरमधून तीन टन आंब्यांची निर्यात

ॲग्रोवन वृत्तसेवा

लासलगाव, जि. नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे शेतीमालाच्या निर्यातीवर (Agriculture Export) परिणाम झाला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे फळांचा राजा (Fruits King) म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात (Mango Export) लासलगावमार्गे अमेरिकेत सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून हापूस, केसर, बदाम या जातींच्या आंब्यांवर विकिरण प्रक्रिया होऊन पहिल्या कंटेनरमधून तीन टन आंबे ९५० पेट्यांतून अमेरिकेला रवाना झाले.

वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगात ओळख बनविलेल्या भारतातील हापूस आंब्याची (Mango ) अमेरिकेतील ग्राहकांना भुरळ पाडली. त्यामुळे आंब्यांची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्षे (Grapes) आणि कांदा निर्यातीत (Online Export) पुढाकार घेतल्यानंतर जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याचे निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपियन महासंघाने पुढे केल्यानंतर भारतातून आयात (Indian Export) होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातली गेली. त्यामुळे हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण ती कायमस्वरूपी मिटली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत आहे. त्यामुळे भारतीय हापूस आंब्यांची (Mango Export) मोठ्या झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निर्यात सुरू आहे.

२० जुलैपर्यंत होणार प्रक्रिया
१२ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या ‘ॲग्रोसर्च’ या कंपनीतर्फे विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या कृषी उत्पादन संशोधन (Agriculture Production Research) केंद्रात हा प्रकल्प कांद्यासाठी (Onion Project) तयार करण्यात आला होता. मात्र येथे आता मसाले व आंब्यावरही विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, (Mango) केसर, दशहरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

यंदाच्या हंगामातील पहिल्या साडेसात मेट्रिक टन आंब्यावर (Mango) विकिरण प्रक्रिया करून आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आंबा लासलगाव येथे विकिरण प्रक्रियेसाठी आला नाही. या वर्षी मात्र ७०० ते ८०० मेट्रिक टन आंब्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- संजय आहेर, विकिरण प्रक्रिया अधिकारी, भाभा अणू संशोधन केंद्र, लासलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT