Fish Processing Industry: नागपूर येथे विदर्भातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत १८.१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. .प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मत्स्य उत्पादनवाढ, तांत्रिक सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या मत्स्य तंत्रज्ञान संकुलात मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत..Integrated Fish and Poultry Farming: मासे आणि कोंबड्यांचे एकात्मिक संवर्धन फायदेशीर.त्यामध्ये मत्स्य शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र व निवास व्यवस्था, मत्स्य रोग निदान प्रयोगशाळा, आधुनिक मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्प (५० टन क्षमता), प्रोसेसिंग व फीड मिल केंद्र, रि-सर्क्युलेटरी अॅक्वाकल्चर सिस्टीम (RAS) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या घटकांचा समावेश आहे..या सुविधांमुळे मत्स्यपालन अधिक वैज्ञानिक, उत्पादनक्षम आणि नफ्याचे होईल असा दावा केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगनियंत्रण, उत्पादनवाढ आणि गुणवत्तापूर्ण मत्स्य उत्पादन साध्य होईल, असेही सांगितले जाते. हा प्रकल्प मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधीअंतर्गत मंजूर करण्यात आला असून, बांधकाम पूर्ण करून निर्धारित मुदतीत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे..Fish Farming Scheme: मत्स्य शेतीसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना.कर्जाची परतफेड १२ वर्षांच्या कालावधीत करावी लागणार असून, सुरुवातीच्या दोन वर्षांत सवलतीचा कालावधी दिला जाणार आहे. या संकुलामुळे विदर्भातील मत्स्य उत्पादनात वाढ होईल त्यासोबतच स्थानिक मच्छीमार व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इतकेच नाही तर मत्स्य व्यवसाय अधिक व्यवसायिक व तंत्रज्ञानाधारित बनेल..एक नजर आकडेवारीप्रकल्प खर्च : १८.१५ कोटीप्रशिक्षण क्षमता : दर वर्षी १,००० मत्स्य शेतकरीमत्स्य खाद्य उत्पादन क्षमता : ५० टन/ प्रति वर्षेप्रकल्प पूर्णता लक्ष्य : मार्च २०२८कर्ज कालावधी : १२ वर्षेव्याजदर : किमान ५ टक्के (पहिली २ वर्षे सवलत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.