Onion Farmers Challenges: खानदेशात पावसाने विविध पिकांसह कांदा काढणी रखडली आहे. नुकसान होईल, या भीतीने काढणी रखडली आहे. कांदा उत्पादकांत भिती असून, आणखी पाऊस आल्यास मोठी हानी होईल, असी स्थिती आहे..अनेक शेतकऱ्यांनी मागील दहा ते बारा दिवसात कांदा काढणीला गती दिली होती. मजुरही अन्य भागातून उपलब्ध करून घेतले जात होते. अशातच या आठड्यात अनेक भागांत वादळी पाऊस, गारपीट झाली आहे..Onion Farmer Crisis: व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी .खानदेशात उन्हाळ कांदा लागवड यंदा स्थिर आहे. ही लागवड सुमारे ३८ हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या धुळे जिल्ह्यातील लागवड २० हजार हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवर कांदा पीक आहे..दर वर्षी सर्वाधिक लागवड धुळे जिल्ह्यात असते. या लागवडीसाठी कमाल शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांत कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी अन्य भागातून रोपे आणली. पाट पद्धतीने तसेच ठिबक, तुषार सिंचन प्रणालीच्या मदतीने सिंचन केले. पीक जोमात होते..Onion Procurement Scam: कांदा खरेदीमध्येही भोंदू खरातचा महाघोटाळा.अशातच गारपीट, पाऊस व उष्णता अशी स्थिती आहे. यामुळे काढणीचे काम रखडले आहे. कारण काढणी केल्यानंतर कांद्यावर पाऊस आल्यास हानी, नासाडी अधिक होईल. यामुळे काढणी थांबल्याची स्थिती आहे. धुळे, नंदुरबार, जळगावातील जळगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर आदी भागांत पाऊस झाला असून, याचा फटका कांदा उत्पादकांना अधिकचा बसू शकतो, असा अंदाज आहे..बियाणे हवे तसे व हवे ते बाजारात मिळत नाही. यंदाची लागवड वाढली आहे. यामुळे दरांचाही प्रश्न आहे. महागाई वाढली आहे. त्यात काढणीच्या वेळेस पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.