Paddy Farming: आजरा तालुक्यातील एक हजार हेक्टरवर आगामी खरीप हंगामात भाताची रोपलागण यांत्रिकी पद्धतीने करण्याचे नियोजन आहे. .आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने यंत्राची खरेदी, तरवा लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व पावसाळ्यात प्रत्यक्ष शेतीवर भातलागणीचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला आहे..Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट.यासाठी सात यांत्रिकी मशिनची मागणी नागालँड व हरियाणामध्ये दिली आहे. यापैकी ७ एप्रिलला दोन मशिन उपलब्ध होणार आहेत..Paddy Farming Mechanization: भातशेतीसाठी यांत्रिकीकरण आवश्यक: डॉ. शहारे.आजरा शेतकरी विकास मंडळाने भाताचे तरवा पेरणी मशिन चेन्नई येथून, तर भात लागण मशिन नागालँड व हरियाणा येथून आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करून एप्रिलमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे..यामध्ये तरवा पेरणी व भात रोपलागण मशिनची माहिती दिली जाईल. भात रोपे तयार करणे, यंत्र चालविणे व हाताळणे, तरवा तयार करणे व यंत्राने पेरणी करण्याची प्रात्यक्षिके व रोपलागण मशिन चालविण्याची प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. पहिल्याच वर्षी एक हजार हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने भात रोपलागण करण्याचे नियोजन आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.