Organic Fertilizer Agrowon
ॲग्रो गाईड

स्पेंट मशरूम कंपोस्टपासून खत निर्मिती

स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यामध्ये अळिंबीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत म्हणजेच दोन महिन्यात उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.

टीम ॲग्रोवन 

सौ. मयूरी देशमुख,मोनिका भावसार

आळिंबी उत्पादनानंतर शिल्लक राहिलेल्या बेड किंवा माध्यमास स्पेंट मशरूम कंपोस्ट किंवा स्पेंट मशरूम सबस्ट्रेट असे म्हणतात. प्रतिकिलो अळिंबी उत्पादनामागे साधारणपणे पाच ते सहा किलो स्पेंट मशरूम कंपोस्ट शिल्लक राहते. चांगल्या दर्जाचे कंपोस्ट तयार करण्यासाठी स्पेंट मशरूम वर योग्य कंपोस्ट प्रक्रिया करावी लागते. स्पेंट मशरूम सबस्ट्रेट हे आधीच अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असते. तसेच त्यामध्ये अळिंबीचे धागे शिल्लक असल्याने कमी कालावधीत म्हणजेच दोन महिन्यात उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.

कंपोस्ट निर्मिती ः

१) आळिंबी काढणी झाल्यानंतर शिल्लक बेड पासून कंपोस्ट तयार करण्यासाठी अळिंबी प्रकल्पातून किमान ४ ते ५ किमी लांब असलेल्या मोकळ्या पडीत जागेची निवड करावी.

२) बेड प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरूनकंपोस्ट निर्मितीच्या जागी न्यावेत. तेथे पिशव्यांमधून बेड बाहेर काढून घ्यावेत.

३) कंपोस्ट तयार करण्यासाठी ढीग पद्धत उपयुक्त आहे. ही पद्धत कोणत्याही कमी किंवा जास्त पावसाच्या प्रदेशातमध्ये उपयोगी ठरते. ढिगाची लांबी आवश्यकतेनुसार आणि रुंदी २ ते २.५ मीटर ठेवावी. आखलेल्या जागेभोवती १० सेंटीमीटर उंचीची मातीचा थर चारही बाजूने द्यावा. त्यानंतर पिशवीतून काढलेले बेड आखलेल्या जागेत एकसारख्या प्रमाणात १ ते १.५ फूट जाडीमध्ये बसवून घ्यावे. थर ओलसर होईल इतके पाणी त्यावर शिंपडावे.

४) थरावर जिवाणू खते (ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम व पीएसबी) प्रत्येक वेळी ५०० ग्रॅम प्रति ५० लिटर पाण्यात मिसळून प्रति १ टन या प्रमाणात प्रत्येक थरावर फवारावे. अशाप्रकारे थरावर थर टाकत जावे. यामध्ये कंपोस्ट जिवाणू संवर्धक टाकण्याची आवश्यकता नाही अळिंबीची उत्तम कंपोस्टिंग घटक म्हणून काम करते.

५) ढीगची उंची १.५ ते २ मीटर झाल्यानंतर थर टाकणे बंद करावे. शेवटचा थर निमुळत्या आकाराचा करावा. त्यावर शेण किंवा माती व पाण्याच्या मिश्रणाने लेपावे, यामुळे ढिगातील उष्णता बाहेर पडणार नाही, कुजण्याची प्रक्रिया जलद होते.

६)साधारणपणे एक महिन्यानंतर ढीगाची उलथापालथ करावी. यामुळे सर्व सेंद्रिय पदार्थ एक सारखे कुजतात. थरातील पाण्याचे प्रमाण कमी वाटल्यास योग्य त्या प्रमाणात पाणी शिंपडावे.

७) या पद्धतीने स्पेंट मशरूम सबट्रेट कुजवल्यास दोन महिन्यात चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.

तयार कंपोस्टमध्ये १.१२ टक्के नायट्रोजन असते, ते वनस्पतींना हळूहळू उपलब्ध होते. ताज्या मशरूम कंपोस्ट चा सरासरी सामू ६.६ ते ७.२५ असतो.

स्पेंट मशरूम कंपोस्टचे फायदे ः

१) दोन महिन्यात कंपोस्ट तयार होते. खर्च कमी येतो.

२) वनस्पतींना आवश्यक प्रमाणात पोषक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

३) जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. पिकास सतत पाणी देण्याची गरज लागत नाही.

४) यामध्ये साधारणपणे १ ते १.१२ टक्के नत्र, ०.५० ते १ टक्का स्फुरद आणि पालाश, ३० टक्के सेंद्रिय पदार्थ, प्रथिने ८.१९ टक्के, कार्बन १६.६ टक्के, कार्बन:नायट्रोजन प्रमाण १५:१ आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

टीप ः या कंपोस्टचा जास्त वापर केल्याने मातीमधील कॅल्शिअमचे प्रमाण वाढून क्षारता वाढण्याची शक्यता असते, म्हणून हे कंपोस्ट सेंद्रिय पदार्थ कमी असलेल्या आम्ल मातीत जास्त उपयुक्त आहे.

(लेखिका मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी

Tur Disease Management : तूर पिकावरील करपा, वांझ रोगाचे व्यवस्थापन

Rice Stocks : यंदा तांदळाचा विक्रमी साठा, मोठ्या प्रमाणात निर्यातीची तयारी

Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी

Vegetable Farming Success : प्रशिक्षणातून भाजीपाला शेतीत तयार केला वार्षिक रोजगार

SCROLL FOR NEXT