Turmeric Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric Pest Management : हळदीमध्ये कीड-रोग व्यवस्थापनावर भर..

Team Agrowon

शेतकरी ः माधवराव दादाराव कदम
गाव ः कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड
एकूण क्षेत्र : २० एकर
हळद लागवड : अडीच एकर


Turmeric Crop : अर्धापूर तालुक्यात कोंढा शिवारात माधवराव दादाराव कदम यांच्या एकत्रित कुटुंबाची साधारण २० एकर जमीन आहे. त्यात अडीच एकरांमध्ये हळद लागवड केलेली आहे. मागील वीस वर्षांपासून ते हळद लागवड करत आहेत. काही वर्षांपूर्वी सरीमध्ये हळद लागवड करीत असत. परंतु त्यात बदल करून माधवराव यांनी बेडवर हळद लागवड करण्यास सुरुवात केली.

योग्य नियोजन केल्यास दरवर्षी एकरी साधारण २२ ते २५ क्विंटल हळद उत्पादन मिळते, असे माधवराव सांगतात. याशिवाय त्यांच्याकडे सोयाबीन ६ एकर, ऊस ६ एकर, केळी बाग अडीच एकर अशी वैविध्यपूर्ण पिकांची लागवड आहे.

लागवडपूर्व नियोजन ः
- या वर्षी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी लागवडीच्या ४ महिने अगोदर जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने चांगली खोल नांगरट करून घेतली.
- त्यानंतर एकरी ३ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात टाकून रोटावेटर मारून घेतला. आणि लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने साडेचार फुटांचे बेड तयार केले.
- बेडवर दोन ओळी ९ इंच, तर दोन बेण्यात ७ इंच अंतर राखत १ जुलैला लागवड केली.


- संपूर्ण क्षेत्रामध्ये हळदीच्या सेलम जातीची लागवड केली.
- लागवडीसाठी एकरी साधारण आठ क्विंटल बेणे लागले.
- लागवडीपूर्वी बेण्यास शिफारशीत घटकांची बेणे प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होतो. बेणे प्रक्रिया करण्यावर विशेष भर दिला जातो.

रासायनिक खत व्यवस्थापन ः
- लागवडीपूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो, पोटॅश ५० किलो, युरिया ५० किलो याप्रमाणे रासायनिक खतांचे बेसल डोस बेडवर दिले. त्यानंतर ९ एचपी पॉवर टिलरच्या साह्याने माती लावून बेड व्यवस्थित करून घेतले.


- लागवडीनंतर १५ दिवसांनी सरीमध्ये पेरून तो ४५ दिवसांनी पॉवर टिलरच्या साह्याने जमिनीत गाढला जातो. यामुळे जमिन भुसभुशीत होऊन उत्पादनात वाढ होते.
- उगवणीनंतर ५० दिवसांनी १०० किलो डीएपी, तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा ३० किलो प्रमाणे देण्यात आल्या.
- लागवडीनंतर तीन महिन्यांनी १२:६१:०, ०:५२:३४, पोटॅश यांचा ठिबकद्वारे वापर केला. लागवडीनंतर साधारण ३ महिन्यांनी या मात्रा देण्यास सुरुवात केली जाते.

कीड-रोग व्यवस्थापन ः
- हळद पिकामध्ये विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण केले जाते.
- विशेषतः हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला.


- कीड-रोगांचा प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार रासायनिक बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात.
- पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर शिफारशीप्रमाणे रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत.

आगामी नियोजन ः
- सध्या लागवड होऊन ४ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
- येत्या काळात पिकास ठिबकद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात सातत्य राखले जाईल.
- पिकाचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या जातील.


- साधारण २० जानेवारीला पिकास पाणी देणे बंद केले जाईल. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हळद काढणी सुरुवात केली जाईल.

माधवराव कदम, ९८८१७८७५२
(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Agriculture Technology : तंत्रज्ञान वापरातून टिकवली प्रयोगशीलता

Rain Update Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून द्या

Onion Import : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये, अशी सरकारची नीती; कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT