Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : हवामान बदलानूसार पीक व्यवस्थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे हरभरा,करडई पिकास आवश्यतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्याव.

Team Agrowon

मराठवाडयात दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहून तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

तर दिनांक २७ जानेवारी ते २ फेब्रूवारी दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे हरभरा,करडई पिकास आवश्यतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्याव. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. 

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी (५ % एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % १३ मिली किंवा अॅसिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

हळद पिकाच्या काढणीस साधारणत: फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देण बंद कराव. 

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्याव. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० %) २५ मिली किंवा क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ %) ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT