Crop Damage Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Damage In Buldana : मोताळा तालुक्यात पिकांचे नुकसान

मोताळा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा व पावसामुळे आडविहीर येथे भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Buldana News : मोताळा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा व पावसामुळे आडविहीर येथे भिंत कोसळून दोन घरांचे नुकसान झाले. तर चार गावातील १९ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

तालुक्यात बहुतांश ठिकाणी शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

वादळी वारा व पावसामुळे आडविहीर येथील अनिल हरी खाचणे यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे ५० ते ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर सुनीता संजय खाचणे यांच्या घराची पडझड होऊन ६० ते ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, तलाठी एन. एस. देवकर यांनी शनिवारी (ता. ८) सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

वादळी वारा व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील राजूर, खामखेड, खडकी, कोऱ्हाळा बाजार या परिसरातील ४२ शेतकऱ्यांच्या १९ हेक्टर क्षेत्रातील गहू, मका, कांदा, ज्वारी, भाजीपाला, करडई या पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT