Crop Advisory
Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : कापूस, तूर, मका कृषी सल्ला

डॉ. कैलास डाखोरे

मराठवाड्यात २० ते २६ जानेवारी या दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कापूस, तूर, मका, सुर्यफूल, ज्वारी पिकांचा सल्ला जाणून घेऊयात. (Crop Advisory)

हवामान अंदाज ः

१) प्रादेशिक हवामान केंद्र (Regional Meteorological Center), मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील ३ ते ४ दिवसांत किमान तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

२) मराठवाड्यात २० ते २६ जानेवारी या दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

३) सॅक, इस्रो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे. तसेच जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.

कापूस ः

१) कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.

२) कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पऱ्हाट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

तूर ः

१) काढणी केलेल्या तुरीची वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मका ः

१) उशिरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

२) इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि.

३) कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे आलटून पालटून फवारणी करावी.

रब्बी ज्वारी

१) पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे.

२) उशिरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तिच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी

३) इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि.

४) कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे आलटून पालटून फवारणी करावी.

रब्बी सूर्यफूल ः

१) वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफूल पिकाची काढणी करून घ्यावी.

गहू

१) पीक कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस) व पीक फुलावर असताना (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) पाणी द्यावे.

२) गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोपिकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १ मिलि.

भुईमूग ः

१) वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.

२) उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत.

३) उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी ८ फेब्रुवारीपर्यंत करता येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

१) केळी बागेत मागील आठवड्यात किमान तापमानात झालेल्या घटीमूळे वाढ खुंटली असल्यास ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी प्रोपिकोनॅझोल १ मिलि.

२) आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून ००:५२:३४ हे खत १.५ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

३) द्राक्ष बागेत घडावर पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून द्राक्ष घड पेपरच्या साह्याने झाकून घ्यावेत.

४) कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे फळबागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला ः

१) भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तणनियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

२) टोमॅटो पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (१८.२%) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एससी) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि.

३) काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी ॲझॉक्सिस्ट्रॉबिन (२३% एससी) ०.२५ ग्रॅम.

४) कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

फुलशेती ः

कमाल तापमानात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

डॉ. कैलास डाखोरे, ७५८८९९३१०५ (मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT