Soybean Pest 
ॲग्रो गाईड

Soybean Pest : सोयाबीनवरील केसाळ अळीचं नियंत्रण

Soybean Crop : मागील काही दिवसात सोयाबीन वरील लोकरी अळीचा व्हीडीओ खूप व्हायरल झाला. मात्र ही अळी खरचं लोकरी अळी आहे का? ही अळी पहिल्यांदाच सोयाबीनवर आली आहे का? आणि या अळीच्या प्रादुर्भावाची कारणे काय आहेत?आणि नियंत्रण कसं करायचं याविषय़ीची माहिती घेणार आहेत.

Team Agrowon

Soybean hairy catterpiller : तारेवरची कसरत करुन शेतकऱ्यानी कशीबशी खरीप पिकांची पेरणी केली. त्यातही ज्या ठिकाणी सोयाबीन ची वेळेवर पेरणी झालीय त्याठिकाणी सोयाबीन पीवळं पडतय. तर काही ठिकाणी विविध किडींचा उद्रेक झालाय. मागील काही दिवसात सोयाबीन वरील लोकरी अळीचा व्हीडीओ खूप व्हायरल झाला. मात्र ही अळी खरचं लोकरी अळी आहे का? ही अळी पहिल्यांदाच सोयाबीनवर आली आहे का? आणि या अळीच्या प्रादुर्भावाची कारणे काय आहेत?आणि नियंत्रण कसं करायचं याविषय़ीची माहिती घेणार आहेत. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली अळी लोकरी अळी म्हणून प्रसिद्ध झाली. लोकरी मावा असतो मात्र लोकरी अळी नावाची कोणतीच कीड नसते. ही कीड लोकरी अळी नसून केसाळ अळी म्हणून ओळखली जाते. ही अळी केसाळ अळी वर्गातील स्पीलोसोमा अळी म्हणून ओळखली जाते. जी प्रामुख्याने सुर्यफूल पिकावर अढळते. यापुर्वी ही या किडीचा सोयाबीनवर प्रादुर्भाव होतं होता मात्र जास्त प्रमाणात नव्हता. त्यामुळे ही कीड काही नविन नाहीएं.  गेल्या वर्षी मराठवाड्यात बऱ्याच भागात या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. सोयाबीनचं वाढलेलं क्षेत्र, पावसाची अनियमितता आणि पेरणी ची बदललेली वेळ या सर्व कारणांमुळे सोयाबीनवर या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.  

ही कीड पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याच्या स्वरुपात अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात अळ्या पिवळसर रंगाच्या असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात केस असतात.  या अळ्या पानाचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने वाळतात. प्रादुर्भाव जर जास्त झाला तर संपूर्ण पान जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. या किडीचा प्रादुर्भाव ओळखून जर उपाययोजना केल्या तर प्रभावीपणे नियंत्रण होऊ शकतं त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीए.  

या किडीच नियंत्रण कसं करायच?

ज्या शेतात यापुर्वी सुर्यफूल पीक घेतल होतं त्याठिकाणी सोयाबीन पीक घेणं टाळावं. शेताच्या कडेनी सोयाबीन पेरणीच्या वेळेसच सापळा पीक म्हणून सुर्याफुलाची पेरणी करावी. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत. अंडी अळी असलेली पाने काढून नष्ट करावीत. किडीचं रासायनिक नियंत्रण करताना. क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर, 

क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९ टक्के ईसी किंवा फ्लुबेन्डामाईड ३९.३५ टक्के एस सी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ७ मिली या पैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

------------

माहिती आणि संशोधन - डॉ. दिगंबर पटाईत,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Dispute : ‘एनएमआरडीए’च्या कारवाईला हायकोर्टाचा दणका

Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

Onion Market : आठवड्याहून जास्त काळ बाजार समित्यांचे काम राहणार बंद

APMC Land : बाजार समितीची जमीन कवडीमोलाने विकण्याचा घाट

Palm Cultivation: यंदा देशातील पाम लागवड क्षेत्रात ५२,११३ हेक्टरने वाढ, 'या' राज्यांत सर्वाधिक

SCROLL FOR NEXT