Chicken
Chicken  Agrowon
ॲग्रो गाईड

Chicken Disease Control : कोंबड्यामधील बाह्य परजीवी आजारांचे नियंत्रण

Team Agrowon

डॉ.आर.सी.कुलकर्णी, के.वाय.देशपांडे, डॉ.आकाश मोरे

Poultry : अंत:परजीवीप्रमाणेच बाह्य परजीवी देखील कुक्कुटपालनात (poultry Farming) अतोनात आर्थिक नुकसान करतात. कोंबड्यामध्ये बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव झाल्यास, त्याचा वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

एकदा शेडमध्ये बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा प्रसार झपाट्याने होतो.शेडजवळ गाई,म्हशी, शेळ्या असल्यास कोंबड्यांना बाह्य परजीविंचा प्रादुर्भाव सहजपणे होतो. बाह्य परजीवी हे कोंबड्यांच्या पिसांच्याखाली व त्वचेवर वास्तव्यास असतात.

बाह्य परजीवी/ किटक हे त्वचेच्या मेलेल्या पेशीवर उदरनिर्वाह करतात. बऱ्याचशा कीटकांना अन्न मिळविण्यासाठी त्वचा हे सोयिस्कर माध्यम आहे. ज्यातून हे रक्त व लसिका (लिम्फ) शोषण करतात, यापासूनच त्यांना आश्रय व उष्णता मिळत असते.

उदा. उवा, पिसवा, स्केली लेग माईट हे पायाच्या खालच्या भागावर पोखरतात. क्विल माईट हे मोठ्या पिसांच्या मुळात असतात.

पिसवा

१) याची अंडी कोंबडीच्या पंखांना चिकटलेली असतात. शारीरिक उष्णतेने अंड्यांची उबवणूक एका आठवड्याच्या आत होते. त्वचेच्या खाली उबवणूक झालेली पिसवा १० ते २० दिवसात मोठी होते.

२) पिसवा कोंबडीच्या शरीराला अगदी चिकटूनच त्यांचे जीवनचक्र पूर्ण करतात. अशाप्रकारे त्यांचा प्रादुर्भाव एका कोंबडीमार्फत सगळीकडे होतो. यामुळे कोंबड्यांना त्वचेचे आजार दिसून येतात.

१) स्टिक टाइट पिसू ः

- या प्रकारच्या पिसवा कोंबडीच्या चेहऱ्याभोवती आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या मांसल भागावर आढळून येतात. या भागात ही पिसवा १९ दिवसापर्यंत राहू शकतात. पोषणासाठी कोंबडीच्या रक्तावर अवलंबून असतात.

२) युरोपिअन चिकन पिसू / कोंबडीवरचे पिसू ः

- या पिसवा कोंबडीच्या घरट्यात राहतात. कोंबडी खाद्यावरसुद्धा आढळून येतात.

- जास्त प्रादुर्भावामुळे कोंबडीमध्ये अशक्तपणा येतो. अंडी उत्पादनात घट येते.

ढेकूण ः

- ढेकूण रक्ताचे शोषण करतो.

- प्रादुर्भावामुळे पंख गळतात. गुद्द्वारास खाज सुटते. छाती, पायच्या स्नायूवर जखमा होतात.

- शेड आणि आवारामध्ये गंधक जाळल्यास ढेकूण नियंत्रण होतो.

डास:

- डास नियंत्रणासाठी पाण्याने भरलेली भांडी काढून टाकावीत. शेड सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी.

- शेडच्या भिंतीवर फवारण्या आणि फॉगिंग करावे.

उवा :

- प्रादुर्भावामुळे पिसे निस्तेज होतात. पायाशी उवांच्या अंड्यांचे द्रव्यमान दिसून येते.

- पायांना खाज सुटते. तेथील पिसे उपटण्याच्या समस्या येतात.

माईट्स (खरुज)ः

- हे खुराडे, भिंती, भांड्याच्या फटीत अंडी घालतात. तिथेच प्रजनन करतात. माईट्सची अंडी २ दिवसात उबवतात आणि त्यातून

निघालेली अळी ३ ते ६ दिवसात प्रौढ होतात.

- प्रौढ कोंबडीच्या रक्तावर पोषण करतात.

१. लाल माईट्स

- यामुळे कोंबडीच्या त्वचेला खाज येते, जळजळ होणे आणि पिसे गळणे/उपटण्याच्या समस्या आढळून येतात.

- गंभीर प्रादुर्भावामुळे अंड्याचे उत्पादन कमी होते, अशक्तपणाचा त्रास होतो.

२) पंखावरील माईट्स (प्रौढ)

- हे माईट्स प्रामुख्याने तेल, मळ, बुरशी आणि त्वचेच्या खवल्यांवर पोषण करतात.

- कोंबड्यांमध्ये त्वचारोग आणि लक्षणीय वजन कमी होऊ शकते.

३) स्केली लेग माईट्स

- स्केली लेग माईट्स हे सामान्यतः मोठ्या कोंबडीवर असतात. हे माईट्स अधूनमधून तुरा आणि गलोलवर प्रादुर्भाव करतात.

- जोपर्यंत तणावामुळे माईट्सची संख्या वाढत नाही तोपर्यंत संक्रमण दीर्घकाळ अव्यक्त असू शकते.

- कोंबडीची चिडचिड होते. पायावरच्या स्त्रावामुळे पाय घट्ट आणि कुरूप होतात.

- पाय आणि पायाचे खवले वाढतात, परिणामी लंगडेपणा येतो.

- कोंबडीच्या त्वचेवर सूज येते. त्वचेला खाज येते. खाद्य खाणे कमी होते.

४) डीप्लुमिंग माईट्स

- हे माईट्स पिसांच्या तळाशी असलेल्या त्वचेला खाऊन टाकतात.

- वसंत ऋतू व उन्हाळ्यामध्ये (मार्च ते मे) कोंबडीची चिडचिड होते. कोंबडीचे पंख कमी होऊ लागतात.

५) नॉर्थन फाऊल माईट

- हे पोषणासाठी कोंबडीच्या रक्तावर अवलंबून असतात. कोंबडीच्या अंगावर सुमारे एक आठवडा जगतात परंतु अनुकूल परिस्थितीमध्ये हे दोन महिनेसुद्धा जगू शकतात.

- कोंबडीमध्ये अस्वस्थता येते. त्वचेची जळजळ होते. यामुळे पिसे गडद आणि घाणेरडी होतात.

-अंडी उत्पादनात घट होते.

- कोंबडीचा तुरा आणि पायाची कातडी फिकट गुलाबी रंगाची होते.

- रक्ताची कमतरता (रक्तक्षय) होतो.

आजार नियंत्रणासाठी उपाययोजना ः

- निदान आणि औषधोपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

- शेड स्वच्छ ठेवावी.वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.शेडमधील फटी व भेगा बुजवाव्यात.

- भिंतीवरील भेगा फ्लेमगनच्या साहाय्याने जाळून कीटकांचा नायनाट करावा.

- नवीन कोंबडी कळपात सोडण्यापूर्वी त्यांना कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे का हे नीट तपासून पाहावे.

- शेडमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश असावा. कारण किटकांच्या उत्पत्तीसाठी अंधार व दमट हवामान पोषक असते.

- फार्मवर कुत्रे, उंदीर आणि मांजरे यांचा प्रवेश टाळावा कारण हे प्राणी कीटकाच्या संसर्गात मदत करतात.

- प्रादुर्भावाने मेलेल्या कोंबडीचे सांगाडे, कातडी, खाद्यान्नाची योग्य विल्हेवाट लावावी.

- शेड सभोवती सांडपाणी साचू देऊ नका.

- शेडमध्ये औषधे फवारताना खाद्यान्न व पिण्याचे पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.

संपर्क ः डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ.आर.सी.कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT