Tomato Variety Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato Variety : टोमॅटो लागवडीसाठी निवडा हे सुधारित वाण

Kharif Season : खरीप हंगामात टोमॅटो लागवड ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड केली जाते.

Team Agrowon

Tomato Cultivation : खरीप हंगामात टोमॅटो लागवड ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड केली जाते. जमीन, बियाणे, रोपवाटिका, पुनर्लागवड, सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

साधारणपणे सरळ वाणांसाठी ४०० ग्रॅम व संकरित वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरसाठी बियाणे पुरेसे होते.  १ हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी ३ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.

लागवडीसाठी सुधारित तसेच संकरित वाणांची निवड करावी. टोमॅटोचे सुधारित, संकरित वाण कोणते आहेत याविषयीची माहिती पाहुया. 

सुधारित वाण  

टोमॅटोमध्ये सरळ व संकरित प्रकारात विविध वाण उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्थानिक, मध्यम ते लांबच्या पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी विविध वाण प्रसारित केलेले आहेत.

अ) सरळ वाण

१) धनश्री - टोमॅटोचा धनश्री वाण मध्यम वाढणारा जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त आहो. या वाणापासून हेक्टरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते.  हा वाण फळ पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारकक्षम असून १६५ दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. 

२) भाग्यश्री

हा वाण मर्यादित वाढणारा आणि जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे.  हेक्टरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते.  १६५ दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. हा वाण फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे.

ब) संकरित वाण

१) फुले राजा

हा वाण सतत वाढणारा असून लांबच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे. हेक्टरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळते. १८० दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. हा वाण फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे.

२) फुले केसरी

हा वाण मर्यादित वाढणारा, फळांचा रंग केसरी असून उत्पादन हेक्टरी ५५ ते ५७ टन मिळते.हा वाण विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम आहे.

३) फुले जयश्री (चेरी टोमॅटो)

फुले जयश्री अमर्यादित वाढणारा असून उत्पादन हेक्टरी ५० ते ५५ टन मिळते. फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम मिळते. हा वाण विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम आहे. 

--------------------------------------------------------

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT