Chana Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Chana Crop : तुमचा हरभरा मोसोंडतो आहे का?

पाणथळ अथवा पानबसन जमिनीत हरभरा पिकाची लागवड, ओलिताचे चुकीने व्यवस्थापन, बागायतीमध्ये युरियाचा अवाजवी वापर अशा कारणामुळे हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते.

Team Agrowon

पाणथळ अथवा पानबसन जमिनीत हरभरा पिकाची लागवड, ओलिताचे चुकीने व्यवस्थापन, बागायतीमध्ये युरियाचा अवाजवी वापर अशा कारणामुळे हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते. हरभरा मोसंडतो म्हणजेच हरभरा पिकाची अवास्तव वाढ होते. त्यामुळे उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी ओलीत व्यवस्थापन करताना आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव कसा टाळायचा याविषयी शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथील जीतेंद्र दुर्गे यांनी पुढील माहिती दिली आहे.

हरभरा पिकात पेरणीपूर्वीचे ओलीत व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे.

स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार आणि ओलीची स्थिती पाहून पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी. म्हणजेच स्प्रिंकलर किती वेळेसाठी लावायचे, हे ठरवावे. अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

यानंतर गरज भासल्यास घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलीनुसार निर्णय घ्यावा.

निंदणीच्या काळात महिला मजूर भाजीसाठी झाडांचे शेंडे खुडून घेतात. असे शेंडे खुडल्यामुळे अवास्तव वाढ टाळता येते. अथवा पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी मशिनच्या साह्याने पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत.

घाटे अळीचा प्रादुर्भाव कसा टाळाल?

हरभरा पिकावर घाटेअळी ही मोठी समस्या ठरते. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.

- हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी, पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट अधिक उंचीचे पक्षिथांबे एकरी १२-१५ प्रमाणात उभारावेत. याकरिता साधारणत: ५.५ ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक काढावे. दुसऱ्या बाजूला १.५ ते २ फूट लांबीची काठी आडवी पक्की बांधावी. जुन्या काळातील टीव्हीच्या ॲन्टेनाप्रमाणे पक्षिथांबे दिसतात. त्यावरून पक्षी घाटे अळीचा फडशा पाडतात.

- पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी (साधारणत: ७ ते १० दिवस आधी) शेतात कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये घाटे अळीच्या हेलील्युअरचा वापर करावा. ल्युअर खाचेमध्ये लावताना त्याला बोटांचा स्पर्श होऊ देऊ नये. पाऊच फोडून ल्युअरचा नरम भाग अंगठा व पहिल्या दोन बोटांच्या चिमटीत पकडून खाच्यात लावावा. रिकामा पाऊचसुद्धा कामगंध सापळ्याच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT