Grape  Agrowon
ॲग्रो गाईड

द्राक्ष बागेतील रोगाचे जैविक व्यवस्थापन

सध्या काही द्राक्ष विभागामधील तापमानात घसरण होत असून, आर्द्रतेमध्ये वाढ होत आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक बागांमध्ये रोगनिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

डॉ. सुजॉय साहा, सुमंत कबाडे, डॉ. आर. जी. सोमकुंवर

सध्या काही द्राक्ष विभागामधील तापमानात घसरण होत असून, आर्द्रतेमध्ये वाढ होत आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक बागांमध्ये रोगनिर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये मॉन्सूनच्या पावसाच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. खरड छाटणीनंतर विशेषतः बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य करपा या रोगाच्या प्रादुर्भावाचे संकेत दिसून येत आहे. या रोगचे नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

रासायनिक बुरशीनाशकांचा अधिक प्रमाणात वापर हा आरोग्य व द्राक्षाच्या उत्तम दर्जासाठीही हानिकारक ठरू शकतो. सोबतच उत्पादन खर्चात होणारी वाढ ही शेतकऱ्यांपुढील समस्या ठरत आहे. दर्जेदार द्राक्षनिर्मितीच्या दृष्टीने जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे फायद्याचे ठरते.

बुरशीजन्य करपा (कोलेटोट्रिकम ग्लेओस्पोरॉईडीस) :

लक्षणे ः करपा रोगामुळे द्राक्षाच्या पानावर बारीक ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार गोल किंवा कोनात्मक असतो. रोगग्रस्त पानावर मोठ्या प्रमाणावर गोलाकार ठिपके येतात. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पानाचा भाग वाळायला सुरुवात होते व छिद्र पडते. यालाच ‘शॉट होल’ असे म्हणतात. त्याच्या पुढील अवस्थेमध्ये संपूर्ण पान करपते. सुरुवातीचा प्रादुर्भाव सामान्यतः कोवळ्या पानांवर होतो. नवीन फुटीवर जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याचा भाग करपतो. रोगग्रस्त पाने आकारहीन व वेडीवाकडी दिसतात. पानाप्रमाणे हा रोग द्राक्ष काड्यावरही आढळतो. सुरुवातीला जांभळट-तपकिरी रंगाचे उभट गोलाकार ठिपके आढळतात. कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून ठिपक्यांचा मधला भाग खोलगट होतो. त्यांची व्याप्ती कडापर्यंत होते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक उत्पादनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये होते. सध्या सांगली जिल्ह्यामधील तासगाव, सोनी या भागात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

व्यवस्थापन :

१) करपाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त भाग छाटून नष्ट करावा. पिकांची काढणी झाल्यावर बुरशीग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्षबाग स्वच्छ ठेवावी.

२) पूर्ण वेलीवर, ओलांडा व खोडावर ट्रायकोडर्मा २-५ मिलि प्रति लिटरची फवारणी करावी.

३) मॉन्सूनच्या सुरुवातीला ट्रायकोडर्मा २-५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे ७ दिवस ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावा.

४) मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे आळवणी करावी.

५) वरील उपाय करूनही करपा रोगाचा प्रादुर्भाव राहिल्यास, हेक्झाकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

करपा रोगाची तीव्रता अधिक असल्यास, कार्बेन्डाझिम १.२ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल १.२ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

जिवाणूजन्य करपा (झान्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस विटिकोला) :

-बागेत ओलसर आणि उबदार वातावरण असल्यास रोगाचा प्रादुर्भाव होतो.

-या रोगाची लक्षणे सामान्यतः कोवळ्या पानांवर दिसून येतात.

-या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या खालील बाजूस काळे डाग दिसून येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटींची वाढ खुंटते. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी वाढ कमी-अधिक झालेली दिसते.

-वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश घडांची विरळणी, छाटणी, शेंडा मारणे आणि गर्डलींग अशा वेळी झालेल्या जखमांमधून होते. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये बरेच दिवस जिवंत राहतात. गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन, निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात. या रोगाचा प्रसार छाटणीच्या तसेच गर्डलिंगच्या हत्यारांमार्फत होतो.

-या रोगाच्या नियंत्रणाकरिता, ताम्रयुक्त बुरशीनाशके किंवा मॅन्कोझेब २-३ ग्रॅम प्रति लिटर किंवा कासुगामायसिन (५%) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५% डब्ल्यूपी) ७५० ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी करणे फायदेशीर ठरते.

-या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्ट्रेप्टोमायसीन अजिबात वापरू नये.

टीप ः राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी तयार केलेले ट्रायकोडर्मा मांजरी ट्रायकोशक्ती (भुकटी) आणि मांजरी वाईनगार्ड (द्रावण) उपलब्ध आहे.

संपर्क - ०२०-२६९५६००२

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor GPS : ट्रॅक्टर ट्राल्यांना जीपीएस, ब्लॅक बॉक्स बसवण्याला विरोध

Ujani Dam Capacity : उजनी धरण १०० टक्के भरले

Reshim Sheti : ऐन चंणचणीच्या काळात रेशीमशेतीचा हातभार

New Mahabaleshwar Project : नवीन महाबळेश्‍वर प्रकल्पामुळे ‘सह्याद्री’चा धोका वाढणार

PDKV Akola : इन्स्टिट्यूशनल फेलो पुरस्काराने ‘पंदेकृवि’चा झाला सन्मान

SCROLL FOR NEXT