Banana Agrowon
ॲग्रो गाईड

Banana Crop Advisory : केळी पिकाची सध्याच्या अवस्थेत काय काळजी घ्यावी?

सध्या जून-जुलै लागवडीतील केळी बागा घड निसवणीच्या, ऑक्टोबर लागवड शाखिय वाढीच्या अवस्थेत आहेत.

Team Agrowon

डाॅ. चंद्रशेखर पुजारी, अंजली मेंढे, डाॅ. गणेश देशमुख

Crop Advisory सध्या जून-जुलै लागवडीतील केळी (Banana) बागा घड निसवणीच्या, ऑक्टोबर लागवड (Banana Cultivation) शाखिय वाढीच्या अवस्थेत आहेत. या अवस्थांमध्ये वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे. बागेत स्वच्छता राखावी.

जून- जुलै लागवड ः

१) सध्या जून- जूलै महिन्यात लागवड (banana cultivation) केलेल्या केळी (keli) बागा निसवणीच्या अवस्थेत आहेत. किंबहुना, काही बागांमध्ये निसवण सुरू झालेली असेल.

२) घड पूर्ण निसवल्यानंतर केळफूल कापावे. तसेच घडावर ८ ते ९ फण्या ठेवून शेवटच्या फण्या काढून टाकाव्यात.

३) निसवणीच्या अवस्थेपर्यंत केळी बागेस शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात आली असेल. असे असले तरी घडाच्या वाढीच्या अवस्थेत पालाश व काही प्रमाणात नत्र या अन्नद्रव्यांची गरज भासते.

४) या अवस्थेत मुळांची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे जमिनीतून दिलेली अन्नद्रव्ये मुळांना शोषून घेणे शक्य होत नाही. त्यासाठी घडांवर फवारणीद्वारे अन्नद्रव्यांची मात्रा देणे फायदेशीर ठरते.

५) यासाठी केळफूल व शेवटची फणी कापल्यानंतर, घडांवर पोटॅशिअम डाय हायड्रोजन फाॅस्फेट (०.५ टक्का) ५ ग्रॅम अधिक युरिया (१ टक्का) १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

६) तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याने थंडीचे प्रमाण कमी होत आहे. ऊन, धूळ, पानांचे घर्षण व किडींच्या प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे घडांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. हे परिणाम टाळण्यासाठी घड ६ टक्के सच्छिद्रतेच्या पाॅलिथिनच्या पिशवीने झाकून घ्यावेत.

७) झाडांना पाॅलिप्रोपिलीनच्या पट्ट्यांनी किंवा बांबूच्या साह्याने आधार घ्यावा.

८) प्रति झाड प्रति दिन ९ ते ११ लिटर ठिबकद्वारे पाणी द्यावे.

९) उशिरा म्हणजेच ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या बागेत रासायनिक खतांचा शेवटचा हप्ता (युरिया ३६ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम प्रति १००० झाडे) द्यावा. ड्रीपमधून खते देताना फक्त म्युरेट ऑफ पोटॅश ५ किलो प्रति झाड या प्रमाणे द्यावे.

ऑक्टोबर लागवड ः

१) ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या बागा सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहेत.

२) या बागांना वेळापत्रकानुसार खतांची मात्रा द्याव्यात. जमिनीतून खते देताना प्रति एक हजार झाडांना युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ५ किलो या प्रमाणे प्रत्येक आठवड्याला द्यावे. ड्रीपमधून खते देताना प्रति एक हजार झाडांसाठी युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रमाणे द्यावे.

३) प्रति झाड प्रति दिन ४.५ ते ६.५ लिटर ठिबकद्वारे पाणी द्यावे.

४) बागेतील तसेच बांधावरील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी.

सिगाटोका नियंत्रण ः

१) बागेत सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, पानांचा फक्त रोगग्रस्त भाग काढून जाळून नष्ट करावा.

२) पानांवर प्राॅपिकाॅनेझाॅल ०.५ मिलि अधिक मिनरल ऑइल १० मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

३) खोडाच्या बगलेत आलेली पिले काढून टाकावीत.

फेब्रुवारी लागवड ः

१) काही भागांत केळीच्या फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते.

२) लागवड करताना गादीवाफ्यावर वाण निवडीनुसार शिफारशीत अंतरावर करावी.

३) लागवडीसाठी श्रीमंती, फुले प्राइड (१.५ बाय १.५ मीटर) आणि ग्रॅंड नैन (१.७५ बाय १.७५ मीटर) या वाणांची निवड करावी.

४) उती संवर्धित रोपांची लागवड करताना एक सारख्या वाढीची, ३० ते ४५ सेंमी उंच व किमान ५ ते ७ पाने असलेली रोपे निवडावीत.

५) सिंचनासाठी ठिंबक सिंचन पद्धतीची सोय करावी.

६) केळी लागवड करतेवेळी बागेभोवती शेवरीची वारारोधक कुंपण म्हणून लागवड करावी.

डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६- ०२५७-२२५०९८६ , (अखिल भारतीय समन्वयीत फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electric Agricultural Tractors: 'इलेक्ट्रिक ट्रॅक्टर'च्या बदललेल्या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा काय?

Silkworm Winter Care: चांगल्या उत्पादनासाठी रेशीम किड्यांची थंडीत काळजी आवश्यक

Rural Health Camp: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आरोग्य शिबिर

Livestock Exhibition: वावी येथे प्रथमच पशू प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन

Rabi Crop Insurance: सव्वा लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीकविमा

SCROLL FOR NEXT