Fodder Crop Agrowon
ॲग्रो गाईड

Fodder Crop : जनावरांची हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी बाजरी, मका लागवड

Fodder Cultivation :

Team Agrowon

Green Fodder : जनावराच्या शारीरिक वाढीसाठी व दुग्ध उत्पादनासाठी (Milk Production) आवश्‍यक असणारी पोषणमूल्ये सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्यापासून मिळतात.

सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दुधाचे उत्पादन हे जनावराच्या आहारावर व त्याच्या वजनावरून ठरविता येते.

येत्या काळात दुधाळ जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी बाजरी, मका चारा पिकाची लागवड करावी.

बाजरी  

बाजरी  चा चारा अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये २ ते ३ टक्के प्रथिने, ३६ टक्के तंतुमय पदार्थ असतात. तर १ ते ३ टक्के क्षाराचे प्रमाण असते. 

या चारा पिकात ऑक्झालिक आम्लाचे प्रमाण हे कमी असून ते सुरक्षित आहे. नेपियर गवताबरोबर बाजरी पिकाचा संकर करून जास्त उत्पादन देणारे संकरीत हायब्रिड नेपियर हे चारा पीक तयार केले आहे.  

या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. परंतु हे पीक हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत चांगले येते. पिकाची चांगली उगवण होण्यासाठी वाफे तयार करावेत. ढेकळे, धसकटे, गवत काढून वाफे समतल प्रमाणात केलेले असावेत.

हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.खरीप हंगामात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

 पेरणीसाठी बाजरीच्या पुसा मोती,  मोती बाजरा, जायंट बाजरा, एचबी- १, एचबी - २ या जातींची निवड करावी. 

लागवडीपुर्वी शेणखत मिसळून द्यावे. प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४०  किलो स्फुरद द्यावे. नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. म्हणजेच ५० किलो नत्र पेरणीच्या वेळी व राहिलेले ३० किलो नत्र हे पहिल्या कापणीनंतर द्यावे.  

पिकाला गरजेनुसार १ ते २ पाण्याच्या पाळ्या आवश्यकतेनुसार द्याव्यात.

पेरणीनंतर ३० दिवसांमध्ये पिकामध्ये १ ते २  कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. 

पीक ५५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पाहिली कापणी करावी. पुढच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात. 

मका  

या पिकात ८ ते १० टक्के प्रथिने, ६० टक्के एकूण पचनीय घटक असतात. मका पेरणीसाठी काळी, कसदार, पाण्याचा चांगला निचरा असणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी. प्रति हेक्टरी  ४० ते ४५ किलो बियाणे लागते. खरीपात पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. 

पेरणीसाठी आफ्रिकन टॉल, गंगा हायब्रिड-२, गंगा-५, किसान, जेएस-२०, इ. जातींची निवड करावी. 

लागवडीपुर्वी जमिनीत शेणखत मिसळावे. हेक्टरी ८० ते १०० किलो नत्र, ४० ते ५० किलो स्फुरद मिसळावे. नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावी. अर्धे नत्र पेरणीच्या वेळी व राहिलेले अर्धे नत्र ३० दिवसांनी द्यावे. 

पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पेरणीनंतर १५ ते ३० दिवसांनी कोळपणी करावी.  पीक ६०  दिवसांचे झाल्यानंतर कापणी करावी. मका चारा पिकाचे हेक्टरी ५०० क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT