Dairy  Agrowon
ॲग्रो गाईड

Dairy Production : दूध उत्पादन वाढीसाठी सिंधुदुर्गात ‘आनंद पॅटर्न’

जिल्ह्यातील दूध उत्पादन १ लाख लिटरपर्यंत वाढविण्यासाठी गोकुळ संघ जिल्ह्यात आनंद पॅटर्न राबविणार असल्याची ग्वाही गोकुळच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील दूध उत्पादन (Milk Production) १ लाख लिटरपर्यंत वाढविण्यासाठी गोकुळ संघ जिल्ह्यात आनंद पॅटर्न राबविणार असल्याची ग्वाही गोकुळच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. जिल्ह्यातील दूध उत्पादन १ लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने सोमवारी (ता. २४) जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघ (Gokul Milk team) यांची संयुक्त बैठक बँकेच्या प्रधान कार्यालयात झाली.

या बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वासराव पाटील, अरुणकुमार डोंगळे, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, अजित नरके, विजयसिंह मोरे, बयाजी शेळके, नंदकुमार ढेगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात २०१३ पासून गोकुळ दूध संघ दूध संकलन करीत आहे. अनेक समस्यांवर मात करीत संघाचे काम सुरू आहे. मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यानंतर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जिल्ह्याचे दूध संकलन १ लाख लिटरपर्यंत न्यायचे आहे. त्यासाठी दूध संघाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. या वेळी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला आनंद पॅटर्न सिंधुदुर्गात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या पॅटर्नअंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थापन, गुंतवणूक या बाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येईल. जिल्ह्यासाठी तज्ज्ञ १० अनुभव डॉक्टर देण्यात येतील असे स्पष्ट केले. शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या सुरू करण्यात येत असलेल्या कार्यालयाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. चारा निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र

SCROLL FOR NEXT