Farmers Producer Company  Agrowon
ॲग्रो गाईड

राज्यात होणार ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद

शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट जगताशी जोडत शाश्वत कृषी विकासाचा मार्ग दाखविणारी राज्यस्तरीय ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद (एफपीओ लिडरशीप कॉनक्लेव्ह) ‘सकाळ अॅग्रोवन’कडून लवकरच आयोजित केली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट जगताशी जोडत शाश्वत कृषी विकासाचा मार्ग दाखविणारी राज्यस्तरीय ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद (एफपीओ लिडरशीप कॉनक्लेव्ह) ‘सकाळ अॅग्रोवन’कडून लवकरच आयोजित केली जाणार आहे.

राज्यातील निवडक २५० एफपीओंमधील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा सहभाग या एकदिवसीय महापरिषदेत असेल. राज्यात हजारोच्या संख्येने एफपीओ स्थापन झालेल्या असल्या तरी मूळ संकल्पनेनुसार बांधणी आणि कामकाज करीत गरुडझेप घेणाऱ्या संस्थांची संख्या अतिशय कमी आहे. ‘एफपीओ लिडरशीप कॉनक्लेव्ह’च्या निमित्ताने शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट क्षेत्राच्या अपेक्षा कळाव्यात, व्यावसायिक अंगाने वाटचाल करण्यासाठी सध्या येत असलेल्या समस्या तसेच राष्ट्रीय व जागतिक बाजारात स्पर्धाक्षम होण्यासाठी महापरिषदेत मंथन होईल. त्यातून या कंपन्यांमधील नेतृत्वाला दिशा मिळेल व एफपीओ क्षेत्राच्या बळकटीकरणाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

एफपीओंमधील नेतृत्वाचा विकास, व्यवसाय व बाजारपेठांमधील नव्या संधी व आव्हाने, उपलब्ध शासकीय योजना आदी महत्त्वाच्या विषयांवर महापरिषदेत चर्चा होईल. यशस्वी एफपीओंच्या प्रतिनिधींचे अनुभव, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील धोरणकर्त्यांचे मार्गदर्शन तसेच सहकारातील कुशल नेतृत्वाकडून अनुभवाचे बोल ऐकण्याची संधी या महापरिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे. कॉर्पोरेट कंपन्या कशा पद्धतीने एफपीओंसोबत भविष्याचे महामार्ग बांधू शकतात, भांडवलनिर्मितीत सरकारी योजनांची भूमिका काय असेल तसेच जागतिक बाजारपेठांमधील संधीचे सोने करण्यासाठी एफपीओंना नेमके काय करावे लागेल, याचाही धांडोळा ही महापरिषद घेणार आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांशिवाय कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास साधला जाणार नाही, हे मान्य झाल्याने आता केंद्र सरकारदेखील या चळवळीला पाठिंबा देत आहे. केंद्राने देशात दहा हजार नव्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीतून सामूहिक शेतीला ऊर्जितावस्था येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘अॅग्रोवन’ची राज्यस्तरीय नेतृत्व महापरिषद दिशादायक ठरणार आहे.

निवडक एफपीओंचाच समावेश
या महापरिषदेत फक्त निवडक एफपीओंचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच नोंदणी करावी. नोंदणी करिता खालील लिंक क्लिक करून किंवा क्युआर कोडवर स्कॅन करून, त्यात माहिती भरावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT