‘स्टिंक बग’मुळे वाढतेय कापसातील बोंडसड 
ॲग्रो गाईड

‘स्टिंक बग’मुळे वाढतेय कापसातील बोंडसड

डॉ. खिजर बेग, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके

नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागामध्ये आतापर्यंत दुय्यम कीड मानल्या जाणाऱ्या स्टिंक बगचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे कपाशी बोंडाची सड होऊन नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.   राज्यामध्ये कपाशी लागवडीखाली क्षेत्र ४२.२ लाख हेक्टरपर्यंत वाढलेले आहे. पूर्वी कापसाबरोबरच ज्वारी, बाजरी, धान (साळ), भुईमूग, सूर्यफूल, तीळ व कारळ इ. अन्य पिकेही लागवडीखाली होती. तसेच देशी कापसाचे क्षेत्रही ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पीक पद्धतीतील बदलाप्रमाणे किडींच्या खाद्यातही बदल झाला. परिणामी कापसाच्या दुय्यम मानल्या जाणाऱ्या स्टिंक बग सारख्या किडीही गेल्या चार -पाच वर्षांमध्ये मुख्य किडी झाल्याचे दिसून येते. सद्यस्थितीमध्ये नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतीच्या सीमावर्ती भागात या किडीच्या प्रादुर्भावामुळे डाग पडून रुई काळी होणे व बोंडे सडणे असे प्रकार आढळत आहेत. बीटी कपाशी लागवड वाढल्यामुळे कीडनाशकांच्या  फवारण्यामध्ये घट झाली. या फवारण्याद्वारे दुय्यम किडींचाही बंदोबस्त होत असे. यामुळे टोचण किंवा शोषण करण्यायोग्य तोंडाची रचना असलेल्या स्टिंक बग व झाडावरील बग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडी प्रामुख्याने बोंडावर प्रादुर्भाव करतात. या किडींचा उद्रेक वाढण्यासाठी सोयाबीन पिकाखालील क्षेत्रातील वाढही कारणीभूत ठरली. सोयाबीन हे स्टिंक बग या किडीसाठी योग्य अश्रित पीक आहे. किडीची ओळख

  • कपाशीवरील स्टिंक बगच्या विटकरी स्टिंक बग (शा.नाव -Euschistus servus), हिरवा स्टिंक बग (शा. नाव -Acrosternum hilare) व दक्षिण अमेरिकेतील हिरवा स्टिंक बग (शा. नाव -Nazara viridula) या प्रमुख तीन प्रजाती आहेत. जगामध्ये कापूस लागवड क्षेत्रामध्ये पर्यावरणीय दृष्ट्या विविधता असून, त्यानुसार प्रजातींमध्ये विविधता आढळते. आपल्याकडे कपाशीमध्ये विटकरी किंवा तपकिरी रंगाचा स्टिंक बग अन्य प्रजातींच्या तुलनेत अधिक आढळतो.
  • स्टिंक बग कापूस, सोयाबीन, मका, भुईमूग, धान्यवर्गीय पिके, फळे, भाजीपाला अशा अनेक पिकांवर व गवतांवर प्रादुर्भाव करतात.
  • अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले प्रथम विविध तणे, मका, भाजीपाला, ज्वारी व फळझाडांवर उपजीवीका करतात. यांची संख्या वाढल्यानंतर कापूस, भुईमूग, सोयाबीन, इत्यादी पिकांवर उपजीविका करतात.
  • या किडीची कोषावस्था मातीमध्ये वाळलेली पाने, वाळलेली गवत, झाडांची साले यात पूर्ण होते.
  • कोषावस्थेनंतर प्रौढावस्थेमध्ये उपलब्ध फळे व बियांवर उपजीविका करतात.
  • आश्रय पिकांशी जुळवून घेण्याची उत्तम क्षमता असल्यामुळे स्टिंक बग या किडींची संख्या वेगाने वाढत आहे. हे भुंगे कापसावर प्रामुख्याने फुले लागणे व बोंडे लागण्याच्या काळात बोंडांवर उपजीविका करतात.
  • यातील ‘काटेदार सैनिक भुंगा’ (शा. नाव - Podisus maculivantris) ही प्रजाती कापूस पिकातील अळ्यांचा फडशा पाडते. त्यामुळे परभक्षी म्हणून कापूस पिकासाठी लाभदायक ठरतात.
  • तपकिरी स्टिंक बग (पेंटोटोमॉईड ढेकूण) ही प्रजाती कापसावर तुरळक आढळून येत आहेत.
  • प्रादुर्भावाचे लक्षण स्टिंक बग प्रौढ प्रथम पाते व बोंडाला छिद्र पाडतो. आतील कोवळ्या सरकीतील रसाचे शोषण करतो. परिणामी बोंडावर बाह्य भागात काळे ठिपके दिसतात. बोंडाच्या सालीवर आतील बाजूस चामखीळीसारखी अतिरिक्त वाढ दिसून येते. अगदी याचखाली रुईवर सुरवातीला पिवळसर चट्टा दिसून येतो. पुढे येथील रुई व सरकी तपकिरी, काळसर होते. रुईवर डाग पडतात. धाग्यांचा गुंता होतो. कोवळ्या सरकीतील रसाचे शोषण झाल्यामुळे ती सुरकुतून जाते. प्रादुर्भावग्रस्त बोंडामध्ये जीवाणू व बुरशींचा शिरकाव होतो. प्रादुर्भावग्रस्त बोंडे सडतात. मोठ्या आकाराची बोंडे सडताना त्यात पाण्याचे प्रमाण वाढते. त्यात अपरिपक्व सरकीला अंकुर फुटतात. या सर्व बाबींचे दुष्परिणाम रुईच्या प्रतीवर होतो. नियंत्रण व्यवस्थापन

  • पिकाच्या बाजूने बांधाच्या शेजारी स्टिंक बग  या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव असल्याची खात्री करावी.
  • सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीस फुलकळीच्या देठाशी असणाऱ्या लहानशा पानावर किडीच्या विष्ठेमुळे ठिपके पडलेले दिसतात.
  • भारतामध्ये ही कीड प्रमुख नुकसानकारक नसल्यामुळे यावर फारसा अभ्यास झालेला नाही व शिफारशी नाहीत.
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया कृषी विद्यापीठातील अभ्यासानुसार, सहा ते सात झाडांवर २०-२५ प्रौढ भुंगे आढळणे, ही आर्थिक नुकसानीची पातळी मानली जाते. या विद्यापीठाच्या शिफारशी खालील प्रमाणे आहेत.
  • फवारणी  (प्रति लिटर पाणी)
  • क्विनॉलफॉस (२५ इसी) २ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मिली (प्रमाण - नॅपसॅक पंपासाठी)
  • संपकर् ः  डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

    Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    SCROLL FOR NEXT