कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड नियंत्रण होण्यास मदत होते. किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. कीटक स्वकीयांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते.
लिंग प्रलोभन रसायन (ल्यूर) वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मीलन होऊ शकत नाही. फेरोमोन सापळा कामगंध सापळ्यास इंग्रजीत 'फेरोमोन सापळा` किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदूषणविरहित उपाय आहे. हा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकलेली असते. त्यास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. त्यामुळे नर हा मिलनाकरिता मादीच्या शोधात कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतो. यामध्ये प्रौढ पतंग आल्यास तो अडकून पडतो. त्यास बाहेर निघणे शक्य होत नाही. असे जमा झालेले नर पतंग पाच ते सात दिवसांत मरतात. अशा प्रकारे किडीची पुढील पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे कीडनियंत्रण चांगल्या प्रकारे होते. अशा पद्धतीने प्रत्येक किडीसाठी वेगळा ल्यूर वापरून त्या त्या किडीचे व्यवस्थापन करता येते.
पिकांमध्ये सापळे लावण्याची पद्धत
फ्लाय ट्री ट्रॅप सापळे वापरताना घ्यावयाची काळजी
वेगवेगळ्या पिकासाठी लागणारे फेरोमोन ल्यूर
अ.क्र. | ल्यूर चे नाव | किडीचे नाव | सापळा | पीक |
१ | हेली ल्यूर | हिरवी बोंड अळी | फनेल सापळा | कापूस ,तूर , हरभरा, टोमॅटो, मिरची, मका |
२ | पेक्टीनो ल्यूर | गुलाबी बोंड अळी | डेल्टा स्टिकी सापळा | कापूस |
३ | गॉस्सी ल्यूर | गुलाबी बोंड अळी | फनेल सापळा | कापूस |
४ | स्पोडो ल्यूर | तंबाखू वरील पाने खाणारी अळी | फनेल सापळा | सोयाबीन कापूस ,भुईमूग, सूर्यफूल, मिरची |
५ | एअर वीट ल्यूर | ठीपक्याची बोंड अळी | फनेल सापळा | भेंडी, कापूस |
६ | ल्यूसी ल्यूर | शेंडा आणि फळ पोखरणारी अळी | वाॅटर सापळा | वांगी |
७ | बोम्बिकोल ल्यूर | रेशीम पतंग | फनेल सापळा | तुती |
८ | व्हॅक्यू ल्यूर | वेलवर्गीय फळ माशी | फ्लाय ट्री ट्रॅप | काकडी, दोडका, दुधी भोपळा, कारली, ढेमसे, कलिंगड, खरबूज |
९ | बॅडोर ल्यूर | फळ झाडावरील फळ माशी | फ्लाय ट्री ट्रॅप | संत्रा, आंबा, मोसंबी, पेरू, चिकू |
संपकर् ः एल. जी. हाके, ९६६५३०४४६७ (कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.) जि. नांदेड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.