उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास पालक ची लागवड फायदेशीर ठरते. 
ॲग्रो गाईड

लागवड पालेभाज्यांची....

डॉ. संजय भावे, डॉ. बालाजी थोरात

पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत पालेभाज्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. भाजीपाला लागवडीसाठी सुधारित जातींची निवड, पाणी व खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.   कोथिंबीर ः

  • कोणत्‍याही प्रकारच्‍या हवामानात लागवड करता येते. उन्‍हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्‍या पुढे गेल्‍यास कोथिंबिरीची वाढ कमी होते.
  • मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन लागवडीस योग्य असते. हलक्या किंवा भारी जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर केल्यास कोथिंबिरीची वाढ चांगली होते.
  • सुधारित जाती ः लाम सी.एस.-२, ४, ६, व्ही-१, व्ही-२.
  • बियाणे ः हेक्टरी ६० ते ७० किलो बियाणे.
  • ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात दोन ओळींमध्ये १५ सेंमी अंतर ठेवून लागवड करावी.
  • हेक्‍टरी ३५ ते ४० गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
  • पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व २० किलो पालाश द्यावे. बी उगवून आल्‍यानंतर २० ते २५ दिवसांनी हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे.
  • कोथिंबिरीचा खोडवा घ्‍यायचा असल्‍यास कापणीनंतर हेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे.
  • पिकाला ४ ते ६ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
  • मेथी ः

  • मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.
  • पेरणीपूर्वी हेक्टरी १० ते १२ टन शेणखत जमिनीत मिसळावे.
  • सुधारित जाती ः कसुरी मेथी, पुसा अर्ली बचिंग
  • बियाणे ः हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे. प्रती किलो बियाणास २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
  • ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यामध्ये दोन ओळींत १० सेंमी अंतर ठेवून करावी. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे.
  • पालक ः

  • मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते.
  • सुधारित जाती ःऑलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरीत.
  • बियाणे ः हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे. प्रति किलो बियाणास २ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
  • ३ बाय २ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यामध्ये दोन ओळींत १५ सेंमी अंतर ठेवून करावी.
  • पेरणीपूर्वी शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी नत्र ८० किलो, स्‍फूरद ४० किलो, आणि पालाश ४० किलो द्यावे. संपूर्ण स्‍फूरद, पालाश आणि नत्राचा पहिला हप्ता पेरणीच्‍या वेळी द्यावा. उरलेले नत्र २ समान भागांत विभागून पहिल्‍या आणि दुसऱ्या कापणीच्‍या वेळी द्यावे.
  • पेरणीनंतर त्वरित पाणी द्यावे. त्‍यामुळे बियांची उगवण चांगली होते. पिकाला नियमित पाणी द्यावे.
  • अळू ः

  • मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.
  • जाती ः कोकण हरितपर्णी किंवा स्थानिक जाती.
  • बियाणे ः लागवड कंदाद्वारे केली जाते. लागवडीसाठी निरोगी कंद निवडावेत. हेक्टरी १२ ते १३ हजार कंदांची लागवड करावी.
  • मशागतीवेळी शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ८० किलो पालाश द्यावे. नत्र व पालाश ही खते तीन समान हप्त्यांमध्ये लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दीड महिन्याच्या अंतराने द्यावे. स्फुरदयुक्त खते लागवडीवेळी द्यावीत.
  • लागवड ःसरी व वरंबा पद्धतीने ९० बाय ३० सेंमी अंतरावर लागवड करावी.
  • २० ते ३० दिवसांच्या अंतराने खुरपणी करावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे.
  • चुका, चाकवत व शेपू ः

  • लागवडीसाठी स्थानिक जातींचा वापर केला जातो.
  • सपाट वाफ्यात ३ बाय २ मीटर आकाराचे वाफे तयार करावे. प्रत्येक वाफ्यात २० सेंमी अंतरावर बी पेरावे.
  • लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी नत्र ४० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे. लागवडीच्या एक महिन्यानंतर प्रति हेक्टर ४० किलो नत्र द्यावे.
  • संपर्क ः डॉ. बालाजी थोरात, ९१४५७७२२९३ (कृषी वनपस्तीशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

    Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

    Agro Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज: संचालक सतीश मराठे

    Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहार चौकशी समितीमधून वगळा

    Delhi Flood: यमुनेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ

    SCROLL FOR NEXT