ॲग्रो गाईड

पानवेल लागवडीची माहिती...

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून, जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी.

राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘कृष्णा पान' ही जात विकसित केली आहे. या जातीची पाने आकाराने जाड व मोठी, पानांचा टिकाऊपणा चांगला, पानांचा आकार लंबगोलाकार असतो. याशिवाय कालीपत्ती, मीठा पान, मघई, बनारसी, देशावरी आणि बांगलावर्गीय जातींची लागवड काही भागांत केली जाते. पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. साधारणपणे चार वर्षे वयाच्या वेलीच्या शेंड्याकडील ४५ सें. मी. लांबीचे चार पेरांचे व पाच पाने असलेले रसरशीत फाटेदार जोमदार बेणे निवडावे.

आधारासाठी लावलेल्या शेवगा, हादगा या झाडांची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी. शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस ३० सें. मी. लांब आठ ते दहा सें. मी. रुंद आणि दहा सें. मी. खोल चर तयार करावा. यात शेणखत मिसळावे. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात ठेवून व माती घालून पायाने दाबावे. दोन वेलींतील अंतर ६० सें. मी. ठेवावे. कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील, याची काळजी घ्यावी. पानमळ्याच्या चारही बाजूंस ताट्या बांधून निवारा करावा. पानवेलींना बांधणी, आंतरमशागत, मातीची भर देणे आवश्‍यक आहे.

संपर्क : ०२४२६- २४३८६१ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

BRICS Agriculture Meeting: ब्रिक्स : समस्या, आव्हाने अन् संधी

Shaktipeeth Highway Opposition: ‘अर्थ’पूर्ण वळणाचा ‘शक्तिपीठ’

Narendra Modi Record: पंडित नेहरूंचा विक्रम मोदींनी मोडला; सलग पंतप्रधानपदाचा नवा इतिहास

Water Scarcity: शिरूरमधील दहा गावांचा घसा कोरडा

Flower Farming: आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचा फूलशेती करण्याकडे वाढतोय कल

SCROLL FOR NEXT