India Political Update: निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोडला. निवडून आल्यानंतर नेहरूंनी सलगपणे चार हजार ३९८ दिवस पंतप्रधान म्हणून काम केले होते. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून चार हजार ३९९ दिवस काम करीत हा विक्रम मोडला..नेहरूंचा कार्यकाळनेहरू यांनी १९४७ मध्ये नियुक्त पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता. देशाची पहिली निवडणूक १९५१-५२ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकली होती. निधनापर्यंत म्हणजे १९६४ पर्यंत ते पंतप्रधान पदावर होते. नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते १३ मे १९५२ या कालावधीत नियुक्त पंतप्रधान म्हणून एक हजार ७३२ दिवस काम केले, तर १३ मे १९५२ ते २७ मे १९६४ या कालावधीत पंतप्रधान म्हणून चार हजार ३९८ दिवस काम केले होते..Political Criticism: मुख्यमंत्र्यांनी एक दिवस बुलेट चालवून लोकांना मूर्खात काढले: रघुनाथदादा पाटील.मोदींनी मानले आभारराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केले आहेच, पण जनतेने सलगपणे निवडून देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पंतप्रधानांना त्यांच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. जनसेवा हीच सुशासनाची सर्वांत मोठी कसोटी असल्याचे मोदी यांनी सर्वांचे आभार मानताना सांगितले आहे..PM Narendra Modi: युद्ध काळात आव्हानांचा एकत्रित मुकाबला करू: पंतप्रधान नरेंद्र मोदी.मोदी यांनी केलेल्या विक्रमाचे औचित्य साधत भाजपचे अनेक नेते, केंद्रीय मंत्र्यांनी मंदिरात पूजा केली. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात तर अश्विनी वैष्णव यांनी लोधी मार्गावरील साई मंदिरात पूजा केली..अन्य पंतप्रपधानांचा कालावधी३,६५६ दिवस- डॉ. मनमोहनसिंग१,६८२ दिवस- अटलबिहारी वाजपेयी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.